परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जालना येथून तिरुपती बालाजीसाठी साप्ताहिक रेल्वेगाडीचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी (ता.30) हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. जालन्यासह संपूर्ण मराठवाड्याला या रेल्वेमुळे तिरुपती बालाजीला जाणे सुलभ होणार आहे.
यावेळी आमदार नारायण कुचे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, भाजप शहराध्यक्ष राजेश राऊत, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आशोक पांगारकर, अतिक खान, घनशाम गोयल, अर्जुन गेही, प्रदेश सदस्य रामेश्वर भांदरगे, बद्रीनाथ पठाडे, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, जिल्हा उपाध्यक्ष बाबूराव खरात, धनराज काबलिये, भाजप तालुकाध्यक्ष वसंत शिंदे, नगरसेवक शशिकांत घुगे, महेश निकम, कैलास उबाळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष भागवत बावणे आदींची उपस्थिती होती.ही रेल्वे जालना येथून परळी, बिदर, हुमनाबाद, रायचूर मार्गे तिरुपती अशी धावणार आहे. या रेल्वेमुळे मराठवाडा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील विविध ठिकाणावरून प्रवास करणार्या प्रवाशांच्या आकांक्षा या रेल्वे गाडीमुळे पूर्ण होणार आहे. ही रेल्वे सुरू होण्यापूर्वी मराठवाडा विभागातून तिरुपतीपर्यंत चार वेगवेगळ्या दिवशी साप्ताहिक विशेष रेल्वे चालविली जाणार आहे. तिरुपती बालाजी या मार्गावर प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ही जादा रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. ही रेल्वे सुरुवातीला ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यात सहा फेर्यासाठी जालना येथून रविवारी सकाळी 11.50 वाजता निघून सोमवारी सकाळी 9.05 वा ही रेल्वे तिरुपतीला पोहोचणार आहे. परतीच्या दिशेने ही रेल्वे गाडी मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजता सुटणार असून बुधवारी सायंकाळी सहा वाजता जालना येथे पोहोचणार आहे.
ही रेल्वे टेम्पल टाऊन तिरुपतीला जाणार्या यात्रेकरू प्रवाशांना अतिरिक्त प्रवास सोय आहे. कर्नाटकातील हुमनाबाद, कुलबुर्गी आणि वाडी यांना थेट रेल्वे सुविधेद्वारे मराठवाडा प्रदेशाची जोडला जाणार आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामधील यादगिर, रायचूर, मंत्रालयम, गुंटकल कडप्पा आदी महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रवास करणार्या लोकांसाठी ही रेल्वे महत्वाची ठरणार आहे.
No comments:
Post a Comment