वसई (प्रतिनिधी) 13 वर्षीय मुलीचं पोट पुढे आले असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. हे पाहून डॉक्टर देखील आश्चर्य चकित झाले आहे. लहानपनी लहान मुलांना काहींना काही करायची सवय असते. बहुतांश मुले हे माती खातात तर काही मुले आपला हाताचा किव्हा पायाचा अंगठा चोखतात.मात्र इथे काही वेगळाच प्रकार घडला आहे. मुंबईच्या वसईमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
13 वर्षीय मुलीच्या पोटातून चक्क 1 किलो किलोचा केसांचा गोळा बाहेर काढला आहे. यामध्ये अशी माहिती समोर येत आहे की, 13 वर्षीय मुलीच्या पोटातून डॉक्टरांनी शास्रक्रिया करून 1 किलो चा केसांचा गोळा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.या मुलीला लहापणापासून च आपले केस खाण्याची सवय होती. तिला आता त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांकडे तपासणी साठी गरली असता. तिच्या पोटातून तब्बल 1 किलोचा केसांचा गोळा बाहेर काढला आहे. लहानपणापासूनच ही मुलगी आपले केस उपटून खात होती. आता तिला याचा इतका भयंकर त्रास जाणवू लागला की तिने काही जरी खाल्ले तर तिच्या पोटात दुखू लागायचे व तिला उलट्या देखील व्हायच्या...पोट सतत भरलेले वाटायचे. तिच्या घरच्यानी तिला वसई येथील एक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी केली असता सदर प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी केली असता तिच्यावर उपचार केले.शास्रक्रिया क्रिया कडून 1 किलो चा केसांना गोळा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.उपचार करण्यासाठी डॉ.जोसेफ डिसोझा यांनी अथक परिश्रम घेतले. व सध्या त्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. (^"याला हेअर बॉल ट्यूमर"^) असे म्हंटले जाते.त्यामुळे लहानमुलांवर आपल्या पालकांनी जास्तीत जास्त लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे डॉ.डिसोझा यांनी सांगितले .

No comments:
Post a Comment