परळी वैजनाथ(प्रतिनिधी):- स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत संपुर्ण देशात छोट्या राज्यामध्ये त्रिपुरा ने पहिला क्रमांक पटकावला आहे. दिल्ली येथील आयोजीत समारंभात राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते त्रिपुराचे नगरविकास सचिव श्री किरण गित्ते यांना पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्द परळी तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने किरण गित्ते यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन आयएएस अॅकॅडमी प्रियानगर येथे दि.6 ऑक्टोबर 2022 रोजी सत्कार करण्यात आला.
यावेळी वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदिप मेश्राम, सुरेशनाना फड,यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल दुबे, अजय जोशी, मिलींद महाविद्यालयाचे प्राचार्य कोम्मवार, महादेव धायगुडे सर, संजय कराड, बंडु आघाव, शारदा विद्या मंदिरचे मुख्याध्यापक अंबादास लोणीकर,मदन कराड, अंकुश फड, पदमाकर आंधळे, जोगदंड सर, बोंडगे सर, प्रा.सुनिल चव्हाण, प्रसाद सर, उबेद सर, संतोष खाडे, रवि कराड, देशमुख सर, , परळी पंचायत समितीचे ओ.एस.दराडे, चाटे सर, ढाकणे सर, महेश मुंडे आदी शिक्षक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment