कांतीकारी साथी जाणून घ्या आजचे राशी भविष्य कसा असेल तुमचा दिवस.
- मेष- दिवस आनंदात जाईल. आवश्यक काम वेळेवर करा. मोठी गुंतवणूक टाळा. नात्यांकडे दुर्लक्ष करु नका. प्रेम संबंधात मतभेद संभवतात.
- वृषभ- मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यापारात सकारात्मक बदल होण्याचे योग आहेत. आर्थिक आवक वाढेल. कुटुंबाती आनंदाचे वातावरण राहील.
- मिथुन- मानसिक ताणतणाव राहिल. मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. संबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो. उधार उसने देणे टाळा.
- कर्क- आर्थिक फायदा संभवतो. जोडीदाराकडून सन्मान मिळेल. नवीन ओकळीतून प्रगतीचे मार्ग खुलतील.
- सिंह- या राशीच्या व्यक्तींना दूरच्या प्रवासाचा योग आहे. प्रेमात यश मिळण्याचे योग आहेत. रागावर नियंत्रण ठेवा.
- कन्या- दिवस संमिश्र असणार आहे. पोटाचा आजार संभवतो. पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा.
- तुळ- आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी नवीन व्यापारात गुंतवणूक करु नये. गाडी चालवताना निष्काळजीपणा करु नका.
- वृश्चिक- वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रश्न निकाली लागतील. उधार दिलेले पैसे परत मिळणार आहेत. अपत्य प्राप्तीचे योग आहेत.
- धनु- आजच्या दिवशी तुम्हाला रोजगारात मोठं यश मिळणार आहे. आकस्मित धन प्राप्तीचे योग आहेत. जीवनसाथीचा सहयोग मिळेल.
- मकर- नोकरी किंवा व्यापारात बदल करु नका. पैसे उधार देऊ नका. मिठाई दान केल्याने फायदा होईल.
- कुंभ- मोठ्या यात्रेचा योग आहे. जुन्या मित्रांची भेट होणार आहे. दिवसातील धावपळ वाढेल.
- मीन- वडिलधाऱ्यांचा सल्ला कमी येईल. कुटुंबात मतभेद होईल असे वर्तन टाळा. प्रवास टाळणे फायदेशीर राहील.
No comments:
Post a Comment