Thursday, October 6, 2022

शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा एकघरी, येथील विकास कामाची चौकशी करण्याची मागणी - मराठा साम्राज्य संघ.


*मा. प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे लेखी तक्रार. 

नांदेड ( प्रतिनिधी)  शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा एकघरी. येथील शाळेतील समस्या व काही बाबींची  चौकशी करून कार्यवाही करणे, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा एकघरी ता. हिमायतनगर जिल्हा नांदेड येथील विध्यार्थ्यांच्या तोंडी सांगण्यावरून व मी मराठा साम्राज्य संघ मुन्ना भाऊ शिंदे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड हिमायतनगर शहराध्यक्ष बालाजी ढोणे मराठा साम्राज्य संघ तालुका अध्यक्ष अविनाश मेंडके अविनाश मेंडके हिमायतनगर  या अनुसंगाने माहितीच्या अधिकारा खाली मिळाली माहिती वरून खालील बाबींची चौकशी  करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
1.शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा एकघरी. येथील शैक्षणिक गुणवता ढसाळलेली आहे सुधारणा करण्यासाठी चौकशी करण्यात यावी.
2.आश्रम शाळेत जनरेटर आणि सोलर हिटरची व्यवस्था करण्यात यावी..
3. C.C.T.V व कॅमेरे शाळेत व वसतिगृह येथे बसविण्याची व्यवस्था करावी....
4.शाळेच्या मुखे गेटवर येणाऱ्या  जाणाऱ्या पालक व कर्मच्याऱ्याची नोंद ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी..
5. प्रति.. महिना पालक व अधिकारी आणि शाळाव्यवस्था पण स्थानिक समितीच्या कार्याचा आढावा घेण्यात यावा.
6.शाळा चालू झाल्या पासून  विध्यार्थ्यांना आता पर्यंत दोन वेळेस मटण देण्यात आले आहे.
7.केळी दिनांक 24 ऑगस्ट 2022 व अंडी 27 ऑगस्ट 2022 पासून देण्यात आली आहे या पूर्वी का देण्यात आली नाही.
8.काही शिक्षक नांदेड येथून अपडाऊन करीत असल्यामुळे शाळेत वेळेवर येत नाहीत अशा शिक्षका मुळे काही दहावीच्या विध्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही
तर खालच्या वर्गाच्या 
काय अवस्था असेल पुढील विध्यार्थ्यांच्या भविष्याचे काय होईल.
9.काही शिक्षक रजेवर जाऊन ही पुन्हा येऊन सह्या करतात
यावर चौकशी व्हावी.
10.जुलै 2022 ते ऑगस्ट 2022 चे C. C. T. V
कॅमेऱ्याचे ऑफिस फुटेज तपासले तर शिक्षक  हजर नस्ताना  सह्या केलेले दिसून येईल
वरील बाबतीत जाणीव पूर्वक दुर्लक्ष असल्यामुळे मुख्याध्यापिकेचे हित समंध असतील असे दिसून येते.
11.शाळेवरील मुख्यालय राहणारे कर्मचारी H. R. A घेतात केव्हा नाही या बाबत चौकशी  होणे आवश्यक आहे.
12.शालेय व्यवस्थापन समिती ची मुदत संपूनही अता पर्यंत पुनर गठीत का करण्यात आली नाही.
वरील बाबतीत मुख्याध्यापिकेची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी
 चौकशी करून कार्यवाही नाही झाल्यास सन दशीर मार्गानी पुढील पाऊले उचलावी लागतील याची दक्षता घ्यावी,असे आव्हान मराठा साम्राज्य संघ हिमायतनगर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment