Sunday, October 16, 2022

ऊर्जा पेट्रोल पंपाचे मालक अब्दुल समद सय्यद यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल!


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) -परळी परिसरातील प्रसिद्ध असद ऊर्जा पेट्रोल पंपाचे मालक  अब्दुल समद सय्यद व अन्य ३असे एकूण ४ आरोपीवर परळी येथील शहर पोलीस स्टेशन मध्ये विनयभांगा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी या ५० वर्षीय महिला असून परळी येथील पेठ मोहला या भागातील रहिवाशी आहेत दी ०९/१०/२०२२ रोजी त्या त्यांच्या घरी असताना  ऊर्जा पेट्रोल पंपाचे मालक आरोपी अब्दुल समद सय्यद , अब्दुल बारी सय्यद , अब्दुल जबिउल्ला सय्यद , अब्दुल फैज सय्यद यांनी फिर्यादी च्या घरी जबरदस्तीने गेट उघडुन आले व फिर्यादीच्या पतीच्या नामे असलेल्या इंटेव्हर गाडी चालू करून परस्पर घेऊन जात असल्याच्या कारणावरून फिर्यदिने त्या अरोपिताना अडवण्याचा प्रयत्न केला व गाडीची चाबी हिसकावून घेतली. मात्र आरोपी हे चार पुरुष असल्याकारणामुळे त्यांनी फिर्यादी महिलेस अर्वाच भाषेत शिवीगाळ केली व तिच्या सोबत अश्लील चाळे केले व तिला लज्ज वाटेल असे कृते केल्याच्या तक्रारीवरून  दी ११/१०/२२ रोजी परळी शहर पोलिस स्टेशन मध्ये वरील आरोपी विरोधात भा द वी कलम ३५४, ५०४,३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,व फिर्यदिने असे जवाबात ही म्हंटले आहे .पुढील तपास शहर पोलिस स्टेशन चे पोलीस करत असल्याचे म्हंटले आहे.
मात्र अश्या घटनेमुळे सबंध परळी शहरात चर्चेला उधाण आले आहे.

No comments:

Post a Comment