परळी वैजनाथ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी शहरात विजयादशमी उत्सव निमित्त सघोष पथसंचलन काढण्यात येणार आहे
ह्या संचलनाची सुरुवात कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय, राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळ येथून दुपारी 4 वाजता होणार असून गोलाई, स्टेशन रोड, बसस्टॅंड, श्री अण्णाभाऊ साठे चौक, कावेरी प्लाझा गार्डन मार्ग, सोनार लाईन मार्ग परत महिला कॉलेज येथे संचलनाचा शेवट होईल, यासाठी संघातर्फे सर्व चोख असे नियोजन करण्यात येणार आहे. शहरातील व परिसरातील स्वयंसेवकांनी या पथसंचलनात उपस्थित रहावे असे आवाहन. रा.स्व.संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment