हिंदुस्थान एरोनॉटिक्स मैदानावर अशी (पब्लिक), बौद्ध आंबेडकरी जनतेचा उसळलेला जन सागर पहाण्याचें भाग्य आणि ऐतिहासिकविराट महाधम्म मिळाव्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले.
पिंपरी चिंचवड नेहरूनगर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड च्या विस्तीर्ण अशा सुमारे 31-32 एक्कर मैदान अक्षरशः खचा खच भरले होतें.
पुण्यातील, पिंप्री चिंचवड येथील मराठवाड्यातील आबालवृद्ध, महिला, मुली, मुले, महिला समता सैनिक व पुरुष समता सैनिक दलाचे हजारो जवान कायदा आणि सुव्यस्थे कांमी मदत करत होतें.
मैदानात लावलेल्या दुचाकी, आणि चार चाकी वाहनास मैदानातून बाहेर पडण्यासाठी सुमारे दीडतास लागला.
शिवाय त्या मैदानाला लागूनच आणखी एक दुसऱ्या हिंदुस्तान एरोनोटिक्स लिमिटेडच्या भव्य मैदानाच्या सभोवताली एक एक किलो मीटरच्या वाहनाच्या दुतर्फा रांगा होत्या.
धम्म मेळाव्याचे धम्मपीठ 15 फूट उंच 150 फूट लांब आणि 50 फूट रुंद असें भव्य दिव्य धम्म मंच पहिल्यांदा पाहण्यात आला.
या धम्म मेळाव्याचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन विकास परिषद, आणि (बानाई )म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंजीनियरिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
आयोजका पैकी एक आयोजक आयु.संतोष जोगदंड यांनी सांगितले कीं,70,000/-खुर्च्या शिवाय D मध्ये 500 तें 800 खुर्च्या होत्या.शिवाय धम्म पिठाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या कार्पेट वर आणि समोरच्या भागात प्रचंड मोठ्या प्रमानात कांही हजार धम्म बांधव मोठ्या संख्येने उभे राहून ऍडव्होकेट श्रध्येय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या भाषणासाठी मोठ्या आतुरतेने उभे होतें.
सदरच्या धम्म मेळाव्याचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य असे की, या मेळाव्यासाठी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या सैनिकांनी शिस्तबद्ध, विनम्रतेने धम्म मेंळाव्यासाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी मदत , सहकार्य केलें.
या विराट धम्म मेळाव्यासाठी आलेल्या बौद्ध बांधवांना, आणि ठिकठिकानाहून आलेल्या आंबेडकरी विचारधारेच्या लोकांना भारतीय बौद्ध महासभा व अनेक स्वयंसेवी संस्थांनी अन्नाची स्वादिष्ट पाकिटे भोजनदानासाठी उपलब्ध करून दिली.पुणे जिल्ह्यातील विविध एकूण 94 बौद्ध विहारांच्या ट्रस्टीज आणि संघटनानी एकसंघ पणाचा प्रत्यय आणून दिला.
वाहनाचे आगमन ते वाहनाचे निर्गमन करण्यासाठी शेकडो समता सैनिक दलाचे सैनिक आणि स्वयंसेवक शिस्तबद्ध पद्धतीने मार्गदर्शन करत मेहनत घेताना दिसत होते. वाहतुकीसाठी मदत करीत होते.
धम्म मेळावा संपल्यानंतर जमलेल्या तरुण बौद्ध आंबेडकर तरुणांनी फोटो काढण्यासाठी अनावर गर्दी केल्याचे पाहून धम्म पीठ तें मैदानाच्या बाहेर पडत असताना बाळासाहेब आंबेडकर जात असलेल्या गाडीचे छत खुले करून गाडीत उभे राहून आलेल्या बौद्ध बांधवांना अभिवादन करत होते.
बंदोबस्तावर असलेल्या एका जबाबदार पोलिस अधिकाऱ्याने या महाधम्म मेळाव्यासाठी दोन लाखाहून अधिक बौद्ध बांधव आल्याची शक्यता वर्तवली.
एक अत्यंत नमूद करण्यासाठी गोष्ट अशी की पुण्यात 12, 13 आणि 14 असा तीन दिवस सलग पाऊस होता. पण 15 ऑक्टोबर 2022 या दिवशी वरूण राजाने पूर्णपणे मोकळीक दिली होती.
स्थानिक वास्तव्य करत असलेल्या लोंकांनी असे सांगितले की, पिंपरी चिंचवड शहराच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये 15 ऑक्टोंबर च्या धम्म मेळाव्या सारखा एकत्रित जनसमुदाय आतापर्यंत बहुधा पहिल्यांदाचं पाहिला असावा.
खरेच विराट महाधम्म मेळावा विराटच झाला.आम्ही भाग्यवान त्या मिळाव्याचे साक्षीदार बनता आलें.
अनंतराव सरवदे, सें. नि. तहसीलदार, लेखक विद्रोह वंचितांचा, बीड
No comments:
Post a Comment