बीड, (जि.मा.का.) :- सरदार वल्लभभाई पटेल यांचा दि. 31 ऑक्टोबर हा जन्म दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7:30 वाजता राष्ट्रीय एकता दौड आयोजित करण्यात आली आहे. तरी क्रिडाप्रेमी नागरिक, युवक व विद्यार्थ्यांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांनी केले आहे.
राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रती वर्षी जिल्हास्तरावर " राष्ट्रीय एकता दौड " ( UNITY RUN ) चे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येते. बीड येथील या एकता दौडचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक- बस स्टँड- शाहीर अणाभाऊ साठे चौक- जालना रोड मार्गे असा राहील. एकता दौडचा समारोप कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुल बीड येथे संपन्न होणार आहे. या एकता दौडमध्ये बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रिडा प्रेमी नागरिक, शासकीय निमशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी, विविध एकविध खेळ संघटना, क्रीडा, युवक, महिला मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, इतर विविध संघटना, खेळाडू, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी सहभागी होऊन राष्ट्रीय एकता दौड यशस्वी करावी.
No comments:
Post a Comment