नांदेड (प्रतिनीधी) शहरात व परिसरात चाकूचा धाक दाखवून नागरिकांना लुबाडणारी महिलांच्या टोळीचा पर्दाफाश नांदेड पोलिसांनी केला आहे, रस्त्यावर आडुन लुटणाऱ्या दोन महिलांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे, दीड लाखाच्या मुद्देमालही जप्त केली आहे.
शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात एका रुग्णालय परिसरात या दोन महिलांनी कंधार तालुक्यातील माधव मोरे यांना चाकूचा धाक दाखवून लुटले होते.
नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या अंकुर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कंधार तालुक्यातील माधव मोरे हे आले होते.दरम्यान लघुशंका आल्याने रेल्वे पटरीच्या बाजुला दुचाकी ऊभी केली होती.
याच वेळी त्यांच्याजवळ एक पुरुष व दोन महिला आल्या. आणि चाकूचा धाक दाखवून मोबाईल अंदाजे 12 हजार 500 व नगदी रक्कम 3 हजार 500 रुपये आणि 65 हजार 500 रुपयांची दुचाकी जबरीने घेऊन दुचाकीवरून पळऊन गेले.या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी व्हाउळे, फौजदार मिलिंद सोनकांबळे, पोलीस हवालदार शेख इब्राहीम, रवी बामणे,दिलीप राठोड, देवीसिंघ सिंघल,शेख अझर यांनी तपासाची चक्रे गतिमान करत मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्या अज्ञात महिला व पुरुषाचा शोध घेतला.
अर्धापुर तालुक्यातील मालेगाव येथील संशयित महिला गंगासागर उर्फ माया राजू माथेकर,वय 30 वर्ष,सीमा संतोष निळकंठे,वय 27 वर्ष, या दोघांनी ताब्यात घेतले असून,त्यांच्याकडुन चोरीला गेलेली दुचाकी,नगदी रक्कम,मोबाईल असा 65 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरी केलेले 60 हजार 419 मोबाईल जप्त केले आहेत.तर या गुन्ह्यात सामील असलेला पुरुष फरार झाला आहे.चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment