परळी वैजनाथ (प्रतिनिधी) टोकवाडी ग्रामपंचायतीत निकृष्ट दर्जाचे आणि बोगस कामे करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या गुत्त्तेदार आणि एजन्सी यांची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यमकारी अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर साखळी उपोषण करण्यात आले होते. या आंदोलनाची अजित पवार यांनी दखल घेतली होती. याप्रकरणी उद्या 20 जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार सूनावणी घेणार असल्याने याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, जिल्हा उपाध्यक्ष गौतम आगळे, प्रसिद्धीप्रमुख बालाजी जगतकर , यांच्या मार्गदर्शना खाली वंचित बहुजन आघाडीचे ता. महासचिव व टोकवाडीचे गावकरी विष्णू मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालया समोर देन दिवस साखळी उपोषणाला केले होते. मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांच्या नेतृ्वा खाली शिष्ठमंडळाने चौकशीची मागणी अजित पवार यांना भेटून केली होती
याबाबत वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, मातंग वस्तीतील मंजूर कामे परवानगी नसताना इतरञ निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. टोकवाडीत बुध्द विहाराच्या बाजूला सरफेस असताना तसेच रस्ता, नाल्या चांगल्या असतांनाही त्याच ठिकाणी कामे करून लाखोंचा भ्रष्टाचार केला. 25/15 अंतर्गत झालेल्या सर्व कामांची चौकशी करावी याबरोबरच एकाच ठिकाणी दोन दोन योजनेतील कामे करून बोगस बीले उचलण्यात आली याची चौकशी करावी. याची दखल घेत 20 जुन रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या दालना मध्ये दोन्ही बाजुची हेरिंग (सुनावणी ) ठेवली आहे. यामध्ये दोषी वर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले आहे.जोपर्यंत योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन चालुच राहणार आहे.
सदर मागण्यांसाठी दि. 23 ,24 मे रोजी वंचित बहुजन आघाडीचे परळी महासचिव विष्णू मुंडे, जिल्हा उपाध्यक्ष गौतम आगळे, राजू जोगदंड, साहेबराव रोडे ,कपील राठोड ,यशोदा राठोड ,कविता राठोड, दीपक राठोड या साखळी उपोषणास बसले होते. दरम्यान टोकवाडी गावावर परळी पंचायत समितीचे माजी सभापती पिंटू मुंडे यांचे वर्चस्व आहे. या सुनावणीत अजित पवार काय निर्णय देतात याकडे परळी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment