Saturday, June 4, 2022

रस्ता ओलांडीताना पादचाऱ्याला कारने उडविले जखमीला रुग्णालयात केले दाखल.!

केज (प्रतिनीधी) येथे सायंकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान केज-कळंब रोडवर विठाई पुरम जवळ रस्ता ओलांडीत असताना एका पादचाऱ्यास भरधाव कारने उडविले.दिनांक .४ मे शनिवार रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान केज-कळंब रोडवर विठाई पुरम जवळ भगवानदास पापालाल लोहिया यांचे मेव्हणे विजयप्रकाश मालपाणी,वय ५५ वर्ष रा.कळंब व त्यांची पत्नी हे दोघे रस्ता ओलांडीत असताना कळंब कडून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिली. यात विजयप्रकाश मालपाणी यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सूरु आहेत. अपघातातील जखमींची तब्बेत चांगली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.दरम्यान अपघात घडताच चालकाने त्याच वाहनातून जखमीस दवाखान्यात दाखल केले आहे.

No comments:

Post a Comment