Friday, June 3, 2022

संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा संघटक पदी सेवकराम जाधव तर परळी वै. शहराध्यक्षपदी विश्वंभर मोरे यांची निवड.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
संभाजी ब्रिगेड पक्षा कडून नुकत्याच काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या असून त्यामध्ये परळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव सर यांची संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली असून  संभाजी ब्रिगेड परळी शहराध्यक्षपदी शिवश्री विश्वंभर मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकतीने उतरणार असून त्याचाच एक भाग या निवडी करण्यामागे आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोज दादा आखरे, संभाजी ब्रिगेडचे महासचिव शिवश्री सौरभ दादा खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष शिवश्री ॲड. राहुल भैय्या वाईकर, संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा संपर्क प्रमुख शिवश्री प्रा.डॉ. सुदर्शन तारक सर, संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रवीण ठोंबरे सर यांच्या आदेशानुसार या निवडी करण्यात आल्या‌ असुन संभाजी ब्रिगेडचे परळी शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव सर यांचा मागच्या काही महिन्याचा संभाजी ब्रिगेडचा झंझावात पाहता येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेडला पूर्ण बीड जिल्ह्यात  खूप मोठा लाभ होणार असून त्यांच्या कार्याची दखल घेऊनच राज्य नेतृत्वाने बढती करत त्यांची संभाजी ब्रिगेडच्या बीड जिल्हा संघटक पदी निवड केली असून त्यांच्या जागी परळी येथील व्यापारी शिवश्री विश्वंभर मोरे पाटील यांची परळी शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पुढील काळातील सर्व निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेड उतरणार असून सर्व बाजूने निष्क्रिय ठरलेल्या प्रस्थापित पक्ष आणि राजकारण्यांना पराभूत करून एक वेगळा पर्याय संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असणार आहे. या निवडीबद्दल संभाजी ब्रिगेडचे परळी वै तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष शिवश्री नामदेव भालेराव, विद्यार्थी आघाडी तालुका सचिव विद्याधर शिरसाठ सह संभाजी ब्रिगेड तालुका व परळी शहर कार्यकारणी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास सदिच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment