Wednesday, June 1, 2022

बीड महसूल चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या.सिंदफणा नदी पात्रातील अवैध वाळू उपसा प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश.

बीड (प्रतिनिधी) सिंदफणा नदी पात्रातील अवैध  वाळू उपसा उत्खनन  यामुळे   यातील  महसूल प्रशासनाचा लाखो  हजार रुपयांचा महसूल  बुडाला आहे . जिल्ह्यातील महसूल  प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे  याचे सर्व पुरावे फोटोसह   जिल्हाधिकारी  यांना या बैठकीत सादर  करण्यात आले  आहेत . 

याबाबतची  सर्व  माहिती   श्री . अशोक  महादेव कातखडे  रा. निमगांव (मा )   ता . शिरूर  ( कासार ) दि . २३/१०/२०२० ते ०७/०३/२०२२ या वर्षामध्ये  निमगांव  ( मा )  नांदेवली , माळेवाडी  ता . शिरूर  ( कासार  ) जि .  बीड  येथील  सिंदफणा  नदीपात्रातुन बेसुमार अवैध वाळू  उपसा उत्खनन होत असल्यामुळे  मी  लेखी  अर्ज  वरील  नमुद  केलेल्या तारखेप्रमाणे  महाराष्ट्र  शासन  व  केंद्र शासन  यांना  वाळु  माफियासोबत संगनमत  करून  शासनाचा कोटयावधी  रुपयांचा महसुल बुडविल्यामुळे  व  पर्यावरणाचा -हास होण्यास  जबाबदार  असलेले अधिकारी  मा. उपविभागीय अधिकारी  नामदेव टिळेकर , बीड  व मा .  तहसिलदार  श्रीराम बेडे  तहसिल कार्यालय  ता . शिरुर ( कासार )  व  तलाठी बाबासाहेब बड़े तलाठी  सज्जा  राळेसांगवी  ता . शिरूर  ( कासार )  व  दादासाहेब आंधळे  तलाठी   तलाठी  सज्जा तितरवणी , ता . शिरूर  ( कासार )  व शासकीय  गुत्तेदार  एन . टी . खेडकर रा . मालेवाडी  पो . खरवंडी  ता . पाथर्डी   जि . अहमदनगर  व  वाळु माफिया  निमगांव ( मा ), नांदेवाली माळेवाडी  ता . शिरूर  ( कासार )  यांच्या  विरुद्ध  पुराव्यासह लेखी  अर्ज वर  नमुद  केलेल्या  विभागांना देण्यात  आलेला आहे . परंतु  अद्याप सबंधीतावर  कुठलीही  कायदेशीर कार्यवाही  करण्यात  आलेली  नाही. याबाबतचे  सर्व  पुरावे  मी २३/१०/२०२० ते ०७/०३/२०२२ या दिलेल्या  लेखी  पत्रासोबत  देण्यात आलेले  आहे .

तसेच  दि. १३/०३/२०२२ रोजी श्री . गणेश  धोक्रट  सहाय्यक  पोलीस निरीक्षक  आर .सी .पी  प्रमुख  पोलीस  अधिक्षक  कार्यालय   बीड यांनी  नांदेवाली  ता .  शिरूर  (कासार ) जि .बीड  येथे  अवैध  वाळू उपसा  उत्खनन  वाहतुक  करताना हायवा  टिप्पर  पकडलेला  आहे . श्री . गणेश धोक्रट सहाय्यक पोलीस निरीक्षक  यांनी जप्त  करुन  तो हायवा  टिप्पर  पोलीस  स्टेशन  शिरुर ( कासार )  यांचे  ताब्यात  दिला  आहे . श्री . गणेश  धोक्रट  सहाय्यक पोलीस  निरीक्षक यांनी सी .आर .पी .सी . कलम १०२ प्रमाणे २ पंचा समवेत सदरील पकडलेल्या अवैध वाळू वाहतुक हायवा टिप्परचा  पंचनामा  केला  त्यामध्ये ६ ब्रास वाळूने भरलेला  हायवा  टिप्पर  आहे असे  स्पष्टपणे  नमुद आहे . परंतु तहसिलदार  श्रीराम बेडे  साहेब शिरूर  ( कासार )  यांनी  निशांत ठाकुर   हे  नांदेवाली येथील अधिकारी असताना  रायमोहा  येथील मंडळाधिकारी  बळीराम खंडागळे यांच्याकडे  पंचनामा  करण्याचे पत्राद्वारे  कळवलेले  आहे. रायमोह येथील  मंडळाधिकारी बळीराम खंडागळे  यांनी  दि . १५/०३/२०२२ रोजी पंचासमक्ष पोलीस स्टेशन शिरूर ( कासार )  येथे  पंचनामा केला  व त्यामध्ये  अंदाजे ३ ब्रास वाळू आहे असे लेखी पंचनाम्यामध्ये नमुद आहे. तरीही ६ ब्रास वाळू असताना ३ ब्रास कमी  दाखवुन  शासनाची  फसवणुक व  दिशाभुल  करुन  शासनाच्या तिजोरीवर  एक प्रकारे  दरोडा टाकण्यात  आलेला आहे . वाळू माफियांना वाचवण्यात आलेले आहे . त्यामुळे  सबंधीत  दोषींवर  निलंबनाची  कार्यवाही  करुन  महाराष्ट्र  शासनाचा जो महसुल बुडवण्यात  आलेला आहे तो  सबंधीत दोषी अधिकाऱ्यांकडून  वसुल  करण्यात यावा . तरी  या प्रकरणात  मा . जिल्हाधिकारी  साहेब शासकीय  भ्रष्टाचार  निर्मुलन  समिती अध्यक्ष  बीड  तात्काळ  दखल  घेऊन संबंधीत  दोषींवरती कठोर योग्य ती कायदेशीर  कार्यवाही  करावी  आशी  मागणी  भ्रष्टाचार  निर्मूलन  समितीचे  शिरूर  ( कासार )  तालुका  अध्यक्ष अशोक  कातखडे  यांनी  केली  आहे .

No comments:

Post a Comment