Monday, May 9, 2022

जिजामाता उद्यानाचे गणेशपार रोडवरील प्रवेशव्दार खुले करा - राजकुमार डाके.

 परळी वैजनाथ ( प्रतिनीधी ) परळी शहराच्या वैभवात भर घालणार्या आणी परळीतील बालकांसह सर्व नागरीकांना फीरण्यासाठीचे एकमेव असणारे ठीकाण म्हणजे राणीलक्ष्मीबाई टावर जवळील जीजामाता उद्याण. या उद्याणास परळीतील सर्वबाजुंच्या नागरीकांना सोईचे व्हावे म्हणुन तीन बाजुंना तीन गेट बसवण्यात आले आहेत परंतु गेल्यादोण वर्षापूर्वि कोरोणा महामारीमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन उद्यानाची तीनहि गेट सील करण्यात आले होते आलीकडच्या काळात राज्यातुन व देशातुन पूर्णपणे कोरोना संपला असुन कोरोनाचे सर्व निर्बंधहि हटवण्यात आले असल्याने सर्व गार्डन परत नागरीकांसाठी खुले करण्यात आले आहे परंतु या गार्डनचे गणेशपार रोडकडील प्रवेशद्वार तेथील रहिवाशांनी स्वत:च्या गाडया पार्कींग साठी व गाडयांच्या सुरक्षेसाठी लोखंडी गेट टाकुन कायमचे बंद करण्यात आले असल्याने गावभागातील नागरीकांना जिजामाता उद्यानात जाण्यासाठी दुरवर पायपीट करावी लागत आहे तरी याची नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत जीजामाता उद्यानाचे गणेशपार रोडवरील प्रवेशद्वार पूर्ववत खुले करुण देण्याची मागणी राजकुमार डाके यांच्यासह असंख्य नागरीकांच्या वतीने करण्यात आली आहे.
             कोराने निर्बंध पूर्णपणे सीथील झाल्यामुळे सर्व तीर्थस्थळांसह सर्व प्रेक्षणीय स्थळे खुली करण्यात आली अयसुन यामुळे परळीचे जीजामाता उद्यानहि खुले करण्यात आले आहे. नुकतेच या उद्यानाचे ना.धनंजयजी मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भव्य सुशोभिकरण करण्यात आले असल्याने हे उद्यान सध्या नागरीकांनी फुलुन जात आहे परंतु या उद्यानाचे गणेशपार रोडवरील प्रवेशद्वार कायमचे बंद असल्याने गावभागातील नागरीकांना अडचण होत आहे. या गेटमधुनच सकाळी गावभागातील बर्याचस्या माता भगीणीसह जेष्ठनागरीक या उद्यानात माॅर्निंग वाॅक साठी येत असतात त्यांनासुध्दा हे गेट बंद असल्यामुळे दुरवर पायपीट करण्याचा ञास सहन करावा लागत आहे तरी  न.प.प्रशासनाने याची त्वरीत गांभीर्याने दखल घेत जीजामाता उद्यानाचे गणेशपार रोडवरील प्रवेशद्वार पूर्ववत खुले करुण देत गावभागातील नागरीकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी राजकुमार डाके यांच्यावतीने करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment