Wednesday, May 11, 2022

शेतकरीपुत्र दत्ता घरत यांनी हरणाच्या पाडसाचे कुत्र्याच्या तावडीतून वाचवले प्राण.डाॅ.गणेश ढवळे यांच्या सहकार्याने पाडस वनविभागाच्या ताब्यात.

बीड (प्रतिनीधी) बीड तालुक्यातील मौजे बोरखेड शिवारात काल हरणाच्या कळपातील हरणाचे पिल्लु नजरचुकीने वाट चुकल्यामुळे एकटे पडले, त्यानंतर कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला असता तेथील शेतकरीपुत्र दत्ता आश्रुबा घरत यांनी कुत्र्याच्या तावडीतून त्याची सुटका करून गोठ्यात नेले, त्याला हिरवा घास, दुध बळंबळंज पाजले, पिल्लु घाबरलेले दिसत होते.आज सकाळी परत हरणाच्या कळपात त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु ते कळपासोबत जाऊ शकले नाही त्यामुळेच शेवटी त्यांनी पांडुरंग घरत यांना फोनवरून कल्पना दिली.
त्यांनी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याशी संपर्क साधला. 
डाॅ.गणेश ढवळे यांनी प्रत्यक्ष त्याठीकाणी भेट देऊन हरणासंबधी वनविभागातील आधिकारी-कर्मचा-यांशी संपर्क साधून सविस्तर माहीती दिली त्यानंतर डोळस मॅडम वनरक्षक करचुंडी बीट यांच्याशी संपर्क साधून वनविभागातील कर्मचारी आनिल शेळके, गौतम वीर, शेख लतीफ, राजीव कोकण ताबडतोब यांनी वनविभागाची गाडी सोबत आणली होती त्यांच्या ताब्यात दिले. 

No comments:

Post a Comment