*वंचित च्या शिष्टमंडळाने केली मागणी.
बीड (प्रतिनिधी) मौजे रामपुरी तलवडा पोलीस स्टेशन अंतर्गत (ता. गेवराई जि.बीड) येथे कहार समाजातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी फरार आरोपीस तात्काळ अटक करुन सदरील खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस कठोर शिक्षाकरण्यात यावी या मागणीचे निवेदन घेऊन पोलिस अधिक्षक भोसले यांची भेट घेतली वंचित बहुजन आघाडी शिष्टमंडळ त्या मध्ये ज्येष्ठ नेते प्रा.विष्णू जाधव, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील,जिल्हाध्यक्ष उद्धव खाडेे, सचिन उजगरे बबनराव वडमारे,पुष्पाताई तुरुकमाने,मेजर अनुरथ वीर,दगडू गायकवाड, यूनुस शेख, भीमराव चव्हाण, डॉ गणेश खेमाडे,आधी पदाधिकारी होते.
मौजे. रामपुरी, तलवडा पोलीस स्टेशन अंतर्गत ता. गेवराई जि. बीड येथे कहार समाजातील ६ वर्षीय उल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. परंतु पोलिसांच्या दिरंगाईमुळे अद्याप सापडलेला नाहीपरंतु पोलिसांच्या दिरंगाईमुळे अद्याप सापडला नाही.सदरील घटनेतील आरोपी हा फरार असून आरोपीस तात्काळ अटक करण्यात येवून सदरील प्रकरणात खटला जलदगती न्यायालयात चालवुन आरोपीस कठोर शिक्षा करण्यासाठी योग्य ते प्रयत्न व्हावेत. तसेच सदरील प्रकरणात शासनातर्फे विधिज्ञ म्हणून अँड. उज्वल निकम यांची नियुक्ती करुन आरोपीस फाशीची शिक्षा होण्यासाठी कारवाई व्हावी, तसचे पीडित मुलीला शासनाकडून मनोधैर्य योजना निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावे, आमची मागणी आपल्या वतीने महाराष्ट्र शासनास कळवावी यासाठी आम्ही वंचित बहूजन आघाडी प्रणित आदिवाशी भटक्या विमुक्त समन्वय समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने आपणास निवेदन देऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे. शिष्ठमंडळा मध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी त्यामध्ये गेवराई पप्पु गायकवाड, नितिन फंने,लक्ष्मण धनोरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र भर वंचित आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
चौकट:-
अँड.प्रकाश आंबेडकर यांनीं स्वतः बीड जिल्हा पोलीस अधीक्षक भोसले यांना फोन करून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे, व अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेवरून वंचितचे शिष्टमंडळ पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या भेटी साठी गेले होते, लवकरच प्रकाश आंबेडकर बीड येथे कुटुंबाची भेट घेणार असल्याची माहित देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment