जालना (प्रतिनीधी) जालना शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, चारित्र्यावर संशयावरून पती, सवत व तिच्या मुलाने मारहाण करून मायलेकीचा खून केल्याची घटना शहरातील सोनलनगर भागात काल सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे, भारती गणेश ऊर्फ संजू सातारे (३६), वर्षा सातारे (१७) अशी मृत माय-लेकींची नावे आहेत.
याप्रकरणी मृत भारती सातारे यांची बहीण पंचशीला पांडुरंग कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मृत भारती सातारे आणि मुलगी वर्षा सातारे यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन गणेश ऊर्फ संजू सातारे, सवतीसह तिचा १६ वर्षांचा मुलगा या तीन जणांनी मारहाण केली होती.
१५ दिवसांपासून व काल रात्रभर सुरू असलेल्या या मारहाणीतच त्या दोघी मायलेकींचा मृत्यू झाला. मृत भारती ही गणेश सातारे याची दुसरी पत्नी होती. तिचे पूर्वी लग्न झालेले होते. पहिल्या पतीपासून तिला दोन मुली झालेल्या असून, एकीचे लग्न झालेले आहे, तर दुसरी मुलगी मृत वर्षा ही होती.
मृत भारती यांचे गणेश सातारे याच्यासोबत लग्नापूर्वीपासूनच प्रेमसंबंध असल्याचे समजल्याने त्यांच्यापासून पहिल्या पतीने १५ वर्षांपूर्वीच वेगळी झाली होती. त्यानंतर गणेश सातारे याने भारती यांच्यासोबत लग्न करून त्यांची दुसरी मुलगी वर्षा हिचा स्वीकार केला होता. भारती यांना गणेश सातारे याच्यापासून झालेला एक मुलगा असून, तो आठ वर्षांचा आहे. आरोपी गणेश ऊर्फ संजू सातारे, त्याची पहिली पत्नी व तिचा १६ वर्षांचा मुलगा अशा तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेहमी होत होती मारहाण
पंधरा दिवसांपासून नेहमी मारहाण होत होती. एके दिवशी रेल्वेस्टेशनकडेही मृत महिलेस मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
No comments:
Post a Comment