Sunday, May 15, 2022
कुंबेफळ बसस्थानकासमोर राज्य रस्त्यावर दुचाकींचा अपघात.तिघे गंभीर जखमी .
केज (प्रतिनीधी) :-दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. रोज जिल्ह्यात कोठे ना कोठे अपघात होताना दिसून येत आहेत. केज पासून दहा ते पंधरा कि.मी. असणाऱ्या कुंबेफळ बसस्थानक परिसरात दोन दुचाकींचा अपघात झाला असून यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.कुंबेफळ बसस्थानक नजीक असलेल्या गणपती मंदिराच्या परिसरात राज्य रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली असून बालासाहेब वसंत काकडे रा. बनसारोळा ता.केज, कृष्णा जोगदंड रा.कळंब, बप्पा रामलिंग स्वामी रा. पिंपळगाव ता. केज हे गंभीर जखमी झाले आहेत. सदरील अपघात रविवारी (दि. 15) रोजी दुपारी झाला आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच 108 चे चालक अर्जुन बारगजे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलवले. परंतु गंभीर जखमा असल्याने त्यांना अंबाजोगाई येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment