Monday, May 2, 2022

गौसे आजम सेवा भावी संस्थाच्या श्रीरामपूर तालुका अध्यक्षपदी मन्वर शेख यांची नियुक्ती.

श्रीरामपुर (प्रतिनीधी) गौसे आजम सेवा भावी संस्थाच्या श्रीरामपूर तालुका अध्यक्षपदी मन्वर शेख यांची नियुक्ती करण्यात आली असून. श्रीरामपूर तालुक्यातील या महत्वपूर्ण पदाची जबाबदारी आपणांस बहाल करताना स्वाभिमान व आनंद वाटत आहे. गौसे आजम सेवा भावी संस्थेचे ध्येय धोरणे व उद्दिष्टये यानुसार सर्व जाती धर्माचे सर्व बोली-भाषिक नागरिकांना विशेषतः बहुजन दलित, अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांना त्यांचा मूलभूत हक्क आणि अधिकार प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रामाणिक व निस्वार्थीपणे कार्यरत राहावे तसेच अन्याय, अत्याचाराच्या विरोधात व न्याय हक प्रस्थापित करण्याकरिता समग्र लढा उभारून  संस्थेचा जनाधार वाढवावा.
     आजतागायत आपण केलेली सामाजिक, राजकीय वाटचाल लक्षात घेवून संस्था-संघटनेच्या वतीने आपल्यावर पूर्णतः विश्वास ठेवून सदर महत्वपूर्ण जबाबदारी आपणांस देण्यात आलेली आहे. आपल्या पुढील सामाजिक, राजकीय, चळवळीच्या गौसे आजम सेवा भावी संस्थाच्या संस्थापक मुख्तार सय्यद , अध्यक्ष सुलतान शेख , उपाध्यक्ष असीम शेख , सचिव नौशाद शेख , शाखा प्रमुख विकास चोपड़े ,राहुरी तालुका अध्यक्ष जीशान आत्तार, आकाश गालफड़े, महोसिन सरदार सय्यद, रामगढ अध्यक्ष तौफीक बागवान, आयन शेख, कार्याध्यक्ष नासिर भाई शेख, यांनी उपस्थित राहून पुढील वाटचाळीला शुभेच्छा दिल्या,

No comments:

Post a Comment