परळी वैजनाथ (प्रतिनिधी) धनगर समाजाचे आराध्य दैवत कर्मयोगिनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त सर्व समाज बांधवानी जयंती घराघरांत उत्साहात साजरी करावी असे आवाहन युवक कार्यकर्ते रमेश सरवदे यांनी केले आहे.
येत्या 31 मे रोजी राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती येत आहे तरी सर्व समाज बांधवांनी जयंती अगदी उत्साहात साजरी करावी असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे रमेश सरवदे यांनी केले आहे..महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात वाड्या-वस्त्यांवर उत्साहात साजरी करण्याचे आवाहन केले आहे. सातबारा कायदा अहिल्यादेवी च्या काळात विकसित झाला. शेती व्यापार इतर व्यवसाय त्यांची भरभराट केली आजचा सातबारा कायदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याच्या काळात विकसित झाला होता. राजकारण समाजकारण अर्थकारण विकास करणे आदी क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला त्यामुळे त्यांनी दिलेल्या कार्याची प्रचंड गरज म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्याचे आवाहन युवक कार्यकर्ते रमेश सरवदे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment