Monday, May 23, 2022

आकसापोटी पोलिसांनी माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले.आ. डॉ.रत्नाकर गुट्टेंचा खुलासा.


गंगाखेड (प्रतिनिधी) आमचा शेतीचा वाद गेल्या ११ वर्षापासून चालू आहे. या प्रकरणी जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊन सर्वे नं. ६/२ मधील १ हेक्टर २ आर. जमीन मधुकर कोरके यांच्याकडून खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या जमिनीचे खरेदीखतही आहे, तरी दि. २० मे रोजी जमिनीच्या पूर्वमशागतीसाठी माझे गडी ट्रॅक्टर घेऊन गेले. त्यावेळी शेषेराव कोरके व त्यांच्या भावाने त्यांना शिवीगाळ करून तिथून निघून जाण्यासाठी दबाव आणला. झालेला प्रकार मला माहित नाही. मी माझे स्वीय सहाय्यक बाळासाहेब पवार यांच्या नातेवाईकांच्या विवाह प्रसंगी बाहेर असताना माझ्यावर पोलीस अधीक्षकांनी कुठलीही शहानिशा न करता छेडछाडीचा गुन्हा दाखल केला. अशी माहीती आ. डाॕ. रत्नाकर गुट्टे यांनी रविवार दि. २२ मे रोजी पत्रकार परिषदेत दिली.

काही राजकीय विरोधकांना मी मतदार संघात करत असलेली विकास कामे बघवत नसल्यामुळे पोलीस अधीक्षकांना वरिष्ठ नेत्यांकडून माझ्याविषयी चुकीची माहिती देऊन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मी त्या ठिकाणी नव्हतो. मी कुठलाही गुन्हा केला नाही पण या खोट्या दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे माझी बदनामी झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करत आहे. तपासाअंती सत्य बाहेर येणारच आहे. पण पोलिस अधीक्षकांच्या विरोधात विधान सभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला होता त्याचा राग धरूनच पोलीस अधीक्षकांनी कुठलीही शहानिशा न करता माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले असल्याची माहिती आ. गुट्टे यांनी दिली.

No comments:

Post a Comment