परळी वैजनाथ (प्रतिनीधी) परळी तालुक्यातील पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी यांना वेळोवेळी माहिती आणि निवेदने देउनही आशा वर्कर्स यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने जिल्ह्यातील आणि तालुक्यातील आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तक युनियनकडून जिल्हा प्रशासनाच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही संघटनांनी दिला आहे.
परळी वै. पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी हे तालुक्यातील आशा वर्कर्सच्या प्रश्नांकडे नेहमीच दुर्लक्ष करत उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप तालुक्यातील आशा वर्कर्स यांनी केला असून गटप्रवर्तक युनियनचे रूपये १७०० प्रमाणे जुलै महिन्यापासूनचे फरक गटप्रवर्तक युनियनचे रूपये ३००० प्रमाणे सप्टेंबरपासूनचा फरक देण्यात यावा. तसेच कोविड लसीकरण मोबाईलायझेशन भत्ता मार्च २०२१ पासून देण्यात यावा. आरोग्य वर्धिनी मानधनात झालेली वाढ रूपये १५०० जुलै २०२१ पासून देण्यात यावे. कुष्ठरोग भत्ता मानधन देण्यात यावे. त्याचबरोबर १००० रु. प्रमाणे कोविड भत्ता सहा महिन्याचा देण्यात यावा. पल्स पोलिओचे एप्रिल २०२२ मानधन आणि ऑपरेशन केसेसचा मोबदलाही देण्यात यावा, अशा अनेक मागण्या बद्दल वेळीवेळी निवेदन देऊनही परळी वै. पंच्यायत समितीचे आरोग्य अधिकारी या प्रकरणी कोणतीही कार्यवाही न करता आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियनच्या कामगारांना उडवाउडवीची उत्तरे देतात. व जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. निवेदनात दिलेल्या मागण्या २९ मे २०२२ पर्यंत पूर्ण न झाल्यास तालुका कार्यालयासमोर ३० मे २०२२ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तक युनियनच्या वतीने देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment