Tuesday, April 5, 2022

वैद्यनाथाच्या परळी नगरीत माजी मंत्री आमदार राजशेखर पाटील,आमदार डॉ.चंद्रशेखर पाटील,आमदार भीमराव पाटील भावंडाचा स-हदय सत्कार संपन्न.

परळी  वैजनाथ (प्रतिनीधी) कर्नाटक राज्यातील तीन सख्खे भावंड विद्यमान आमदार असलेले हुमनाबाद मतदार संघाचे माजी मंत्री राजशेखर पाटील, पदवीधर आमदार डॉ.चंद्रशेखर पाटील,स्थानिक स्वराज्य मतदार संघातील आमदार भीमराव पाटील यांचा राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे व पदाधिकारी,निर्मळे-मेनकुदळे परीवार तसेच सर्व समाज बांधवांच्यावतीने गांधी मार्केट येथील सर्वेश्वर महादेव पार्वती मंदीरात 
भव्य सत्कार करण्यात आला.
       तीन्ही आमदार बंधू प्रभू वैैद्यनाथाच्या दर्शनासाठी 3 एप्रिल रोजी आले होते.
  विशेष बाब म्हणजे माजी मंत्री आमदार राजशेखर पाटील हे उदगीर येथील निटुरे परीवार तर आमदार डॉ.चंद्रशेखर पाटील परळीचे प्रसिध्द आडत व्यापारी कै.रवीन्द्र निर्मळे परीवाराचे जावई तसेच आमदार भीमराव पाटील हे वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे यांचे जावई आहेत.
   सत्काराला उत्तर देताना माजी मंत्री आमदार राजशेखर पाटील यांनी वैद्यनाथ प्रभूच्या स्पर्श दर्शन व -हदयस्थ केलेल्या सत्कारामुळे जन सामान्यांसाठी कार्य करण्याची आत्मिक ऊर्जा व समाधान मिळाल्याचे सांगून जनतेच्या प्रश्न सोडविण्याठी पाटील परीवार सदैव तत्पर असल्यामुळेच सात वेळा विधानसभेचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी वडील माजी मंत्री कै.बसवराज पाटील यांच्या विकासात्मक व लोकाभिमुख कार्यातून जनतेच्या आशीर्वादामुळेच मिळाल्याचे सांगितले.यावेळी पदवीधर आमदार डॉ.चंद्रशेखर पाटील यांचे खुमासदार शैलीत भाषण झाले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक चेतन सौंदळे यांनी तर आभार वैद्यनाथ बँकेचे संचालक महेश निर्मळे व सुत्रसंचालन शेखर फुटके यांनी केले.
     सत्कार समारंभ प्रसंगी नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे, डॉ.सुरेश चौधरी,शिवशंकरअप्पा निर्मळे,नगरसेवक पवन मुंडे,अनिल अष्टेकर,उद्योजक विजयशेठ वाकेकर,शाहूराव ढोबळे,रमेशअप्पा सपाटे,सोमनाथ निलंगे,चंद्रकांत उदगीरकर,संजय स्वामी,आश्विन मोगरकर,मनोज संकाये,सुधीर फुलारी,योगेश निर्मळे,जगदीश मिटकर,मकरंद नरवणे,नागेश निर्मळे,रवी मिसाळ,प्रा.डॉ.अमर आलदे,महारूद्रअप्पा उदगीरकर,सोमनाथ गोपनपाळे,चंदूअप्पा हालगे,संजय खाकरे,कुमार व्यवहारे,सचिन काटकर,कैलास रिकीबे,शिरीष सलगरे,चंद्रकांत अंदुरे,कुमार केदारी,अनिल मिसाळ,आदेश हलकंचे,संतोष चौधरी,अशोकअप्पा झाडे,गजानन हालगे,रत्नेश बेलुरे,संदीप चौधरी,निरंजन गौरशेटे,मनोज बेंबळगे,सौ.श्रध्दा हालगे,सौ.चेतना गौरशेटे,गोदावरीअक्का चौधरी यांच्यासह मोठया संख्येने समाज बांधव उपस्थितीत होता.

No comments:

Post a Comment