Thursday, April 14, 2022

कांतीकारी साथी न्युज आजचे राशी भविष्य, १४ एप्रिल २०२२, ग्रहमानाची अनुकूलता, चांगली संधी चालून येईल, सरकारी कामात यश मिळेल.

*मेष -   कामाच्या निमित्ताने फिरणे होईल. थोडी दगदग होईल. आरोग्याची काळजी घ्या. उन्हात फिरणे टाळा. विविध प्रकारचा लाभ होईल. मात्र काही बाबतीत मनस्ताप होईल. काळजीच्या विचारांना थारा देऊ नका. महत्त्वाच्या कामात अडचण येईल.

*वृषभ - विविध प्रकारचा लाभ होईल. योग्य मार्गदर्शन मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मुलांच्या यशाची वार्ता कानावर पडेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. अचानक चांगली संधी मिळू शकते     

*मिथुन - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. चांगली संधी चालून येईल. या संधीचा लाभ घ्या. पाहुणे येतील. काहींना प्रवास करावा लागेल. सरकारी कामात यश मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल.     

*कर्क - धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसायात बरकत राहील. भावंडांची भेट होईल. अचानक जवळचा प्रवास करावा लागेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमचे महत्त्व वाढेल. भाग्याची साथ मिळेल.      

*सिंह - आर्थिक आवक चांगली राहील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. मनासारखे भोजन मिळेल. मनात सकारात्मक विचार राहतील, असे प्रयत्न करा. जीवनसाथी आपल्याला साथ देईल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल.   

*कन्या - महत्त्वाचे काम दुपारनंतर हाती घ्या. तोपर्यंत कामाचे नीट नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मनात आनंदी विचार राहतील. सर्वांचे सहकार्य मिळेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.   

*तूळ -  आर्थिक आवक चांगली राहील. खर्च पण वाढेल. प्रवास घडून येईल. महत्त्वाच्या कामात अडचण येईल. नोकरीत साधक-बाधक परिस्थिती राहील. मुलांच्या यशाची वार्ता कळेल. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. जीनवसाथी चांगली साथ देईल. 

* वृश्चिक -  ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. नोकरीत सर्वांचे सहकार्य मिळेल. एखाद्या व्यक्तिमुळे गैरसमज होतील. मुलांना यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. विविधी मार्गांनी धनप्राप्ती होईल. प्रवासकार्य साधक ठरेल. भेटवस्तू मिळेल.

*धनू -  भाग्य साथ देईल, नोकरीत चांगली परिस्थिती राहील. चांगली संधी मिळेल. काही बदल होतील. नवीन प्रकल्पात तुमच्यासाठी चांगली संधी राहील. घरी पाहुणे येतील. भावंडांविषयी गैरसमज होईल. वाद होऊ शकतो. मुलांना अपेक्षित यश मिळेल.

*मकर -  नशिबाची साथ मिळेल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मालमत्तेच्या कामांना गती मिळेल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. तुमचे महत्त्व वाढेल. घरी पाहुणे येतील. खाण्यापिण्याची चंगळ राहील.    

*कुंभ - महत्त्वाचे काम दुपारच्या आत उरकून घ्या. अन्यथा वेळ आणि पैसा खर्च होईल. दगदग होईल अशी कामे करू नका. वाहन जपून चालवा. जीवनसाथी चांगली साथ देईल. काही कारणाने गैरसमज निर्माण होऊ शकतात. आर्थिक आवक चांगली राहील.

*मीन -  जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. तरुणवर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू मिळेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. मनात सकारात्मक आनंदी विचार राहतील.

No comments:

Post a Comment