___
बीड शहरातील कॅनाल रोड आदर्श नगर भागातील कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी सीट बेल्ट न लावल्यामुळे माजी नगरसेवकांच्या मुलाला २०० रूपये दंड केला, मुलाने दंड भरला देखील मात्र त्याचवेळी त्याठीकाणी आलेल्या माजी नगरसेवकाने पोलिसांवरच आगपाखड करत तुम्ही हफ्ते घेता, वाळुचे ट्रक सोडुन देता त्यांच्यावर कारवाई करत नाही म्हणत भर चौकात पोलीस प्रशासनाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली, संबधित प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तक्रार करून हुज्जत घालून अरेरावी व शासकीय कामात अडथळा आणले म्हणून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली असता त्याची तक्रार दाखल करून घेण्यास सुद्धा टाळाटाळ केली, याचवेळी वरीष्ठ पोलीस आधिका-यांना भेटण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांला वरिष्ठांनी भेटच नाकारली त्यामुळेच पोलीस कर्मचारी आता रितसर पोलीस अधिक्षक यांच्याकडे दाद मागणार आहे.
पोलीस निरीक्षकांनी माजी नगरसेवकाच्या राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्याला भेटले पण कर्मचा-यांला ताठकळत ठेवले
____
पोलीस कर्मचा-यांने रितसर तक्रार दाखल करण्याची तयारी दाखवल्यानंतर राजकीय नेत्याच्या निकटवर्तियाने कारवाई करू नका म्हणून फोन केला परंतु पोलीस कर्मचारी गुन्हा दाखल करण्यावर ठाम असल्याचे कळताच संबधित पोलीस निरीक्षकाला फोन लाऊन त्यांची भेट घेतली त्याचवेळी संबधित पोलीस निरीक्षकाने सदर पोलीस कर्मचा-यांला ताठकळत बाहेर ठेवले, आतमध्ये त्यांचे बोलणे झाल्यावर सदर पोलीस कर्मचा-यांची तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली.
न्याय मागण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचा-याला वरिष्ठांनी भेट नाकारली
___
पोलीस निरीक्षकाने तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्यानंतर संबधित पोलीस कर्मचा-यांने वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्याचा ईरादा बोलुन दाखवला परंतु वरिष्ठ पोलीस आधिका-यांने त्यांना भेटण्यास नकार दिला. त्यामुळे आता पोलीस अधिक्षक यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देणार असल्याचे सांगितले.
पोलीस दलातील कर्मचा-यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रकार निषेधार्ह
____
राजकीय नेत्यांच्या दबावाखाली वरिष्ठ पोलीस आधिका-यांकडुन त्यांच्याच खात्यातील कर्तव्यावर असलेल्या कर्मचा-यांना न्याय मिळत नसेल त्यांचक तक्रार दाखल करून घेण्यास नकार देत असतिल आणि त्याचवेळेस वरिष्ठ आधिकारी भेट घेण्यास नकार देत असतील तर त्यांचे मानसिक खच्चीकरण होणार त्याउलट राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा मुजोरपणा वाढुन कायदा व सुव्यवस्था बिघडणारच त्यामुळेच वरिष्ठांनी राजकीय दबावाला बळी न पडता कनिष्ठांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment