Thursday, April 14, 2022

हाॕस्पिटल समोरील रिक्षा काढ म्हणल्यामुळे महिला डॉक्टरचा विनयभंग करून मारहाण. तिघा विरोधात गुन्हा दाखल.


गेवराई (प्रतिनीधी) : हॉस्पीटलच्या समोर उभा असलेला रिक्षा काढण्यास सांगितल्याच्या कारणावरुन आरोपीनी हॉस्पिटलमध्ये प्रवेश करून हात धरून विनयभंग करत मारहान केली असल्याच्या आरोपाखाली तिघाजनांच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे तसेच या तिन्ही आरोपींना गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

गेवराई तालुक्यातील गढी या ठिकाणी असलेल्या एका हॉस्पिटलच्या समोर काल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रिक्षा लावला होता तो काढण्यास सांगितला असता रिक्षावाल्याने वडील व भाऊ यांना बोलावून हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर रित्या प्रवेश करून माझ्या पती सह मला मारहान करून वाईट हेतूने माझा हात पकडला तसेच माझी ओढणी ओढून माझा विनयभंग केला असल्याची तक्रार महिला डॉक्टर यांनी गेवराई पोलिसांत दाखल केली आहे

तसेच हा सगळा प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला असल्याची बाब समोर आली आहे या प्रकरणी शहरातील संपुर्ण डॉक्टरांनी गेवराई पोलीस ठाण्यात गर्दी केली होती .

No comments:

Post a Comment