परळी वैजनाथ (प्रतिनीधी) क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले जयंती ते भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान एकञ उपक्रम घेउन गुरु शिष्याची संयुक्त जयंती साजरा करण्याची मागणी सामाजीक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काॅग्रेसचे राजकुमार डाके यांची मागील अनेक वर्षापासुनची राज्यशासना कडील मागणी नुकतीच राज्याचे सामाजीक न्यायमंञी तथा बीड व परभणी जिल्हयाचे पालकमंञी मा.ना.धनंजयजी मुंडे साहेब यांनी पुर्ण करत राज्यात सामाजीक न्याय विभागाच्या वतीने राज्यभर दिनांक ०६ एप्रील ते १६ एप्रील दरम्यान राज्यभरात "डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजीक समता कार्यक्रम" राबउन पूर्ण केली असल्याने राज्यातील तमान फुले, शाहु, आंबेडकरी अनुयायामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे मन राजकुमार डाके यांनी व्यक्त केले व सामाजीक न्यायमंञी मा.ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्यासह सर्व मंञीमंडळाचे जाहिर आभारहि व्यक्त करण्यात आले.
स्वराज्यसंस्थापक छञपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले, छञपती शाहु महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभुमी कर्मभुमी असलेल्या महाराष्ट्र राज्यात दि. ११ एप्रील फुले जयंती ते १४ एप्रील आंबेडकर जयंती दरम्यान "सामाजीक न्याय सप्ताह" म्हणुन साजरा करावा. भारतीय समाजव्यवस्थेत सामाजिक रुढीपरंपरेच्या नावाखाली अशपृश्यतेच्या बुरख्यातुन दिनदलीत बहुजन समाजाची पीळवणुक थांबवत पीढयाणपीढया गुलामगीरीत खीतपत पडलेल्या तमाम बहुजन समाजाला या मनुवादी गुलामगीरीतुन मुक्तकरण्यासाठी आद्यक्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांनी या मनुस्मृत्ती विचारसरणीवर आसुड ओढत समतेची बीजे रोवली असे आद्यक्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले यांचा ११ एप्रील महात्मा फुले जयंती पासुन. महात्मा फुलेंनी मांडलेली वैचारीक मुल्ये भारतीय राज्यघटनेत आधोरेखीत करुण त्यांना कायद्यात रुपांतरीत करुण तमाम बहुजन समाजाला सन्मानाचे आयुष्य बहाल करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रील आंबेडकर जयंती पर्यन्त या दोन महामानवांचा जन्मोत्सव सोहळा सर्व राज्यभरात "सामाजिक न्याय सप्ताह" म्हणुन संपुर्ण राज्यभर मोठयाप्रमाणात साजरा करुण याद्वारे देशभरातील मनुस्मृतीवर आसुड ओढत विविध सामाजीक चालीरुढी व अंधश्रध्देवर प्रकाश टाकणारे व तमाम बहुजन समाजातील अशिक्षीत अढाणीपणा दुर करत शिक्षणाचे महत्व पटवुन देणारे व भारतीय राज्यघटनेवर प्रकाशटाकणारे विविध उपक्रम या कालावधीत मोठयाप्रमाणात राबउन फुले, शाहु, आंबेडकरांना अभीप्रेत असलेली समाजव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न व्हावेत असेहि या निवेदनात म्हटले होते. शासनाच्या या सामाजीक समता कार्यक्रमाच्या रुपाने या मागणीस यश आले असल्याचे मत सामाजीक कार्यकर्ते राजकुमार डाके यांच्यावतीने व्यक्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment