*आमदार संदीप क्षीरसागर व बाबु जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती"
बीड (प्रतिनिधी) चौसाळा शहरात प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जंयती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवुन साजरी करण्यात येणार आहे
गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनोसारख्या महाभयंकर आजारामुळे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करता आली नाही
माञ यावर्षी शासनाने कोरोनोचे सर्व नियम शिथील केल्यामुळे यावर्षी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी होणार असुन १४ एप्रिल रोजी राजर्षी शाहू नगर याठिकाणी पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण होणार असुन संध्याकाळी सहा वाजता सर्वधर्मिय अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे
१५ एप्रिल रोजी चौसाळा परिसरातील निराधार वृद्धांना आधार म्हणुन अन्नधान्य बरोबरच किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे
१६ एप्रिल रोजी पिपंळाच्या १३१ वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे
१७ एप्रिल रोजी गोरगरिब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे तसेच २०एप्रिल रोजी राजर्षी शाहू नगर येथुन सांयकाळी ०५ ते १० यावेळेत भव्य दिव्य ढोलताशाच्या गजरात मिरवणूक निघणार आहे तसेच २१ एप्रिल रोजी भोजन ठेवण्यात आले तरी चौसाळा व बालाघाट परिसरातील सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष विवेक(बाबा)कुचेकर, दलित युथ पँथर चे मराठवाडा राज्य सचिव व बीड जिल्हा अध्यक्ष पवन कुचेकर, स्वप्नील सोनवणे, महेंद्र सोनवणे, प्रकाश ढोकणे,विनोद तायड,बबलु आदमाने,रवी सोनवणे,जितीन काळे,आमोल जावळे,प्रदीप ईगोंले,सुरज तुपारे,कपिल मस्के,वैभव सोनवणे,प्रमेश्वर निर्मळ,राज सोनवणे, दत्ता साळवी,शैलेश वाघमारे,विशाल कांबळे, बाळासाहेब गायकवाड, मच्छींद्र गायकवाड, प्रेम तुपारे, सचिन रूपवते,सागर सिरसाळे,अजय ईगोंले,राजेश सुरवसे,कृष्णा चव्हाण,शंकर सोनवणे,विकी ढोकणे,बाबु ढोकणे, भैय्या शिंदे,सतिष रूपवते,बाळु सोनवणे,अजय पवार,चंदन सोनवणे, यांच्यासह सर्व समाज बांधवानी केले आहे.
No comments:
Post a Comment