आभिजित कुडे उखर्डा या छोट्याश्या गावातून राजकारणाची सुरुवात करणार सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा . आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष पदावर मजल करणारा २१ वर्षाचा मुलगा.
राजकारणाची सुरुवात वयाच्या १८ वर्षापासून लागली . शिक्षण शिकत असताना अचानक राजकारणामध्ये आवड निर्माण झाली. गावाच्या चौकात बसल्यावर गावापासून तालुका तर जिल्ह्यापर्यंत राजकारणाच्या गोष्टी रंगायच्या त्यावेळी एक नाव चर्चेत होते विलास भाऊ नेरकर त्याकाळी हे नावं ऐकले की अंगाला काटा यायचे .
त्यांच्या मार्गदर्शक व नेतृत्व मध्ये अभिजित राजकारणाचे धडे द्यायला लागला.
गावापासून राजकारणाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अभिजीतने तालुक्यात मजल गाठली व तालुका उपाध्यक्ष पद मिळाले त्यानंतर स्वतःच्या कार्याने न वेगळ्या शैलीमुळे त्यांच्यावर अल्पकाढताच विधानसभा अध्यक्ष पदाची धुरा जिल्हा अध्यक्ष नितिन भाऊ यांनी दिली. नितिन भाऊ यांचे अत्यंत विश्वासू म्हणून अभिजीत कडे बघितले जाते. अभिजित च्या या प्रवासात त्यांच्या मिञ परीवार यांचा सिंहाचा वाटा असल्याचे अभिजीत सांगत असते.
गावं पातळी चे राजकारण करताना अभिजित हे अनेकांच्या डोळ्यात आले. लोक नाहीं ते नाव ठेवायचे . मागे काही पण बोलायचे पण अभिजित मध्ये एक महत्वाचा गुण होता विरोधकांनी काहीही टीका केली तरी ते प्रतिउत्तर देत नव्हते . आणि एक वाक्य नेहमी म्हणत असे इतिहास गव्हाई दे या ना दे पर आणे वाला समय सलामी जरुर देगा!! गावपातळीवर राजकारण करत असताना वीलास भाउ नेरकर यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांच्या कडे बघितले जात होते त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता त्यानी नेत्याचे काम प्रामाणिक पने केले त्यांच्या निष्ठेचे फळ देखील त्यांना मिळाले.
गावात निवडणुका तोंडावर आल्या अभिजीत यांच्या कडे एक युवा नेतृत्व एक् उमेद म्हणून सगळे बघू लागले त्यांच्या कामाच्या जोरावर त्यानी सर्व सामान्य माणसाच्या मनात आपल वेगळ स्थान निर्माण केले आहे लोकांचा विश्वास संपादन केला आहे. पण त्यांचे वय कमी असल्यामुळे स्वतःच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रोवला .
उखर्डा या छोट्याश्या गावातून राजकारणाची सुरुवात करणार युवक आज विधानसभेचे नव्हे तर जिल्ह्याचे राजकारण करतों आहे हे आमच्या साठी कौतुकास्पद आहे अभिमानाची बाब आहे .
गावपातळीवर राजकारण आपण पाहत असतो ते तितके सोप नसत त्यातच एक सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा राजकारण करत समाजकारण करत सर्व सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड करतो. त्यांच्या साठी लढतो . कोणतेही पाठबळ नसताना सर्व सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावतो. त्याच्या याच कार्यामुळे लोकांच्या मनात त्यांची जागा निर्माण झाली आहे.
राजकारण करत असताना समाजकारणाचा केंद्रस्थानी ठेवून अभिजित कार्य करत असतो. राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करायचे हेच उद्दिष्ट घेउन तो राजकारणात आला आहे. गावाच्या विकासासाठी तसेच सभोवताल चे प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत आहेत. मोठ्या मोठ्या नेताना लाजवेल असा काम तो करत आहे. युवकांची अभिजीत च्या पाठीशी खंबीर साथ आहे. युवकांची फौज घेउन या समोर वेगळी दिशा देण्याचे काम तो करणार हे नक्की.
राजकारण करत असताना अभिजित यांनी शिक्षणाला सुद्धा महत्व दिले.
गावातील युवकांना लॉकडाऊन मध्ये शिक्षणाचे धडे द्यायला अभिजीत समोर आला या कार्यातून अभिजित ची समाजाप्रती काहीतरी करण्याची इच्छा आहे हे दिसून येते . दररोज वेगळे वेगळे उपक्रम तो राबवत असतो . समाजाला फुल न फुलाची पाकळी देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांसोबत अभिजित चे निकट संबंध आहे . स्वच्छ प्रतिमा असलेले नेतृत्व म्हणून त्यांची सर्वत्र ओडख आहे.
आपल्या लोकांसाठी नेहमी तत्पर असलेला युवक सर्व सामान्य माणसाच्या कामासाठी नेहमी धावून जातो .
येणाऱ्या काळात तालुक्याच्या राजकारणात अभिजित कुडे हे नाव केंद्रस्थानी राहणार हे नक्की!
✍️ रोशन अंकुशराव भोयर *
No comments:
Post a Comment