परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मागील दोन वर्षापासून कोरोना प्रार्दुभाव असल्याने वैद्यनाथ प्रभूंचे पारंपारिक स्पर्श दर्शन प्रशासनाने बंद ठेवले होते. आज गुढीपाडव्यापासून सर्व निर्बंध पूर्णपणे कमी केल्यानंतर वैद्यनाथ प्रभूंचे स्पर्श दर्शन पुन्हा सुरू होत असून या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे आपण आभारी आहोत असे एका पत्रकाद्वारे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त केले आहे.
परळी शहरातील द्वादश ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले वैद्यनाथ मंदिर शिवभक्तांसाठी दर्शनाकरिता यापूर्वीच खुले करण्यात आले होते. परंतू प्राचीन परंपरेनुसार श्रीं चे स्पर्श दर्शन घेता येत नव्हते. शासनाने सर्व निर्बंध दुर करून स्पर्श दर्शन सुविधा आज एका आदेशाद्वारे सुरू केली असून याबद्दल शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार ठक्कर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
No comments:
Post a Comment