परळी वैजनाथ (प्रतिनिधी) इस्लाम धर्मात पवित्र रमजान महिण्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच मुस्लिम बाधंवाना रोजा फर्ज सक्तिचे असतात, लहानपासून मोठ्यांपर्यंत या महिन्यात रोजा धरत आहे. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालस निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले,चिमुकली हि मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा धरतात. असाच प्रकारे परळी शहरातील पेठ मोहल्ला येथे शरीफ भाई गुत्तेदार यांची चिमुकली अस्किया शेख यांनी पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून (दि.६) एप्रिल बुधवारी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा रखरखत्या उन्हातही दिवसभर अन्नाचा कण व पाण्याचा एक थेंब न घेता काटेकोरपणे यशस्वी पूर्ण केल्याबद्दल नातेवाईक व ईतरानी ही त्याचे कौतुक व अभिनंदन करत आहे.
No comments:
Post a Comment