परळी वैजनाथ :- परळी वै. शहरासह तालुक्यात उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेने शहरातील बाजापेठेत आणि ग्रामीण भागात शुकशकाट पसरला असून नागरीकांचे घराबाहेर येणे अवघड झाले आहे. गेल्या काही दिवसापासुन महाराष्ट्रभर उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे. मार्चनंतर सुरू होणारा उन्हाळा यावर्षी मार्च महिन्यापासुन चालू झाल्याचे दिसते आहे. निसर्गातील बदलांमुळे महाराष्ट्रातील काही भागामध्ये दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळ्यात उष्णतेचे प्रमाण जास्त पटीने वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याचा परिणाम शहरातील बाजारपेठ आणि व्यवसायावर पडताना दिसतो आहे.
परळी शहरात आणि तालुक्यात उष्णतेची तीव्रता वाढल्याने नागरीक शहरातील बाजापेठेत दिवसभर येणे टाळताना दिसत आहेत. कोणतेही काम असो नागरीक सकाळी येऊन बारा वाजेच्या आगोदर आपले काम आटोपून घरी जात आहेत. शहरातील बाजारपेठेत दुपारी १२ ते ०४ पर्यंत कोणीच फिरकत नसल्याने शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट पसरला असून बाजारपेठेतील सर्व दुकाने, हॉटेल रिकामेच दिसत आहेत. उष्णतेची वाढलेली तीव्रता पाहता नागरीक सकाळी १२ वाजे पर्यंत आणि दुपारी ४ ते ५ च्या नंतर आपली कामे करण्यासाठी शहरात येताना दिसतात. एप्रिल, मे आणि जून महिन्यात यापेक्षा जास्त उष्णतेची तीव्रता वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment