Monday, April 4, 2022

परळीकरांच्या पाहुणचाराने आपण भारावून गेलो आहोत.कर्नाटक येथील आमदारांनी सत्कारा दरम्यान व्यक्त केल्या भावना .



परळी वैजनाथ (प्रतिनीधी) परळीकरांच्या आत्मीय पाहुणचाराने आपण भारावून गेलो आहोत, प्रभू वैद्यनाथाचे दर्शन व पूजा केल्याने समाधान वाटले,हे  प्रेम  कायम मिळत राहो अशी अपेक्षा कर्नाटक येथील माजी मंत्री व आमदार  श्री.राजशेखर पाटील यांनी परळी येथे बोलताना व्यक्त केली*                                      वडिल  कर्नाटकचे  माजी मंत्री स्व बस्वराज पाटील यांचे बिदर जिल्ह्यात व राज्यात मोठे योगदान आहे .त्यांच्या  पुण्याईने     राजकारणात आमच्या कुटुंबास यश मिळाले, जनसामान्यांच्या सेवे मुळे राजकारणात शक्ती मिळाली असेही माजी मंत्री राजशेखर पाटील यांनी सागितले                                           रविवारी कर्नाटकातील तीन आमदारांचा महाराष्ट्रीयन पद्धतीने  परळीत गांधी मार्केट येथे सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते, यावेळी पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ श्री.चंद्रशेखर पाटील यांचें ही खुमासदार शैलीत भाषण झाले
हुमनाबाद (कर्नाटक)येथील आमदार श्री.राजशेखर पाटील  , पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ श्री.चंद्रशेखर पाटील,स्थानिक स्वराज्य संस्थेचें आमदार भीमराव पाटील हे  सख्खे भाऊ आहेत , रविवारी दुपारी  त्यांनी श्री प्रभू वैद्यनाथा चे दर्शन घेतलें व प्रभू वैद्यनाथास  अभिषेक केला
  यावेळी  त्यांचे  मंदिरात वैद्यनाथ ट्रस्टच्या वतीने सचिव राजेश देशमुख विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे    यांनी  स्वागत केले,   श्री विजयकुमार मेनकुदळे यांच्या निवासस्थानी भेट दिली .मेनकुदळे  यांच्या निवासस्थानी तिनही  आमदारांचे जोरात स्वागत करण्यात आले, वेळी  विजयकुमार  मेनकुदळे  ,योगेश मेनकुदळे , वैद्यनाथ बँकेच्या संचालक सुरेखाताई मेनकुदळे यांनी सत्कार केला
त्यानंतर तीन आमदारांचा निर्मळे परिवाराच्या वतीने  गांधीमार्केट मधील सर्वेश्वर मंदिर येथे  सत्कार वैद्यनाथ बँकेचे संचालक महेश्वर निर्मळे, शिवशंकर आप्पा निर्मळे, योगेश निर्मळे ,नागेश निर्मळे,शशांक निर्मळे,अभिजीत निर्मळे,सिद्धराज निर्मळे यांनी केला, यावेळी सौ प्रेमा राजशेखर पाटील सौ योगीता चंद्रशेखर पाटील सौ विद्या भीमराव पाटील, परळी च्या नगराध्यक्षा सौ सरोजनीताई हालगे ,डॉ सुरेश चौधरी,शाहूराव  ढोबळे, विजयसेठ वाकेकर नगरसेवक प्रा पवन मुंडे,नगरसेवक चेतन सौंदळे,नगरसेवक अनिल अष्टेकर,शिवकुमार व्यवहारे,प्रा सुधीर फुलारी,अश्विन मोगरकर,संजय खाकरे,शिवकुमार केदारी,महारुद्र अप्पा उदगीरकर नरेश हालगे,नागेश हालगे,सचिन गित्ते,डॉ यशवंत देशमुख, नितीन समशेटे ,रामेश्वर कोकाटे , श्रद्धा हालगे,,गोदावरी चौधरी,चेतना गौरशेटे व निर्मळे परिवारातील आप्तेष्ट,स्नेही,व्यापारी आदी मान्यवर उपस्थित होते,वीरशैव प्रतिष्ठान युवा मंच व राष्ट्रसंत श्री  शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर अनुष्ठान समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच समितीच्या वतीने चेतन सौन्दळे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर फुटके यांनी व योगेश निर्मळे यांनी प्रास्ताविक केले तर सर्व उपस्थितांचे महेश्वर निर्मळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment