Friday, April 1, 2022

आयुक्तांसोबत किसान सभेची बैठक.अतिरिक्त ऊसाचा गाळपासाठी तात्काळ कार्यवाही सुरू.

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) राज्यभरातील विशेषतः मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस प्रश्नी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सचिव डॉ.अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शिष्टमंडळ व पुणे येथे साखर आयुक्तांनी बोलावलेली याबाबतची महत्वपुर्ण बैठक गुरुवार दि 31 रोजी संपन्न झाली.तब्बल 2 तास चाललेल्या या बैठकीत साखर आयुक्तांनी बीड परभणी जालना येथे ऊसअतिरिक्त होऊ शकतो हे मान्य करीत ह्या ऊसाचे तात्काळ गाळप करण्याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी साखर आयुक्तांनी शिष्टमंडळास दिले.
राज्य किसान सभेचे शिष्टमंडळ गुरुवार दि 31 रोजी राज्य सचिव डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना भेटले.या बैठकीत राज्य किसान सभेचे उमेश देशमुख अँडअजय बुरांडे,मुरलीधर नागरगोजे, दत्ता डाके जगदीश फरताडे,दिपक लिपने, सुधाकर शिंदे यांच्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत साखर आयुक्तांनी बीड, परभणी, जालना व उस्मानाबाद येथील अतिरिक्त ऊस बाहेरील कारखान्यात गाळपास जावा व दैनंदिन आकडेवारी शासनाच्या लक्षात यावी यासाठी बीड जिल्ह्यासाठी २ व परभणी जिल्ह्यासाठी २ विशेष नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करत याकडे लक्ष ठेवण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले तसेच या कामी प्रशासन,साखर कारखाने व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या समन्वयासाठी व प्रत्येक ऊसाचे गाळप होई पर्यत किसान सभा लक्ष देणार असल्याचे या बैठकीत ठणकावून सांगण्यात आले.
शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप होण्याबरोबरच उशिरा गाळप झाल्याने होणारे नुकसान भरपाई देण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली आहे.साखर आयुक्तांनी दिलेले ठोस आश्वासन प्रत्यक्षात अंमलात नाही आले तर राज्य किसान सभा पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी साखर आयुक्तांना देण्यात आला.या बैठकीचा पाठपुरावा म्हणून बीड जिल्हा किसान सभा शुक्रवार दि 1 रोजी बीड जिल्हाधिकारी यांना भेटणार आहे.

No comments:

Post a Comment