आज रोजी आम्ही सपोनि मुंडे, सोबत पोलीस नाईक घुगे बक्कल नंबर 1633 ,पो. शि. पांचाळ /1313, बंटी येरदलावार बक्कल नंबर 1476 म. शिपाई शेवाळे ब. नं. 2294 असे पो. स्टे. हद्दीतील सेवानगर तांडा वनवासवाडी चे बाजूला येथे सकाळी 06:30 वाजता जाऊन दारू अड्ड्यावर रेड केली असता तेथे
1. गिताबाई गंपू पवार वय 60 वर्षे ही राहते घराच्या समोरील आवारात 01 लोखंडी ड्रम ला भट्टी लावून दारू गाळत असताना दिसून आली त्यात अंदाजे दोनशे लिटर रसायन व इतर दोन कॅनमध्ये 20 लिटर तयार दारू असे एकूण 06 हजार रुपयाची दारू काढताना मिळून आली. तसेच 2. सगुना विक्रम राठोड व 45 वर्षे ही तिचे राहते घराचे बाजूस अंदाजे 01 प्लास्टिकच्या ड्रममध्ये अंदाजे 150 लिटर रसायन , दोन लोखंडी रिकाम्या टाक्या तसेच दहा लिटर तयार दारू असा एकूण 07 हजार रुपये चा मुद्देमाल बाळगताना मिळाली. योग्य सॅम्पल घेऊन दारू काढण्यासाठी लागणारे इतर साहित्य जसे ड्रम, प्लास्टिकचे हंडे, टोपले, कॅन हे देखील जागीच नष्ट केले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
No comments:
Post a Comment