Tuesday, April 12, 2022

मुख्याधिकार्‍यांना वेळोवेळी पेन्शनसाठी शिष्टमंडळ भेटूनही सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना उपोषणाला बसावे लागले.तर न.प.कर्मचारी यांची ही दोन महिने झाले पगारी नाही.हे न.प.प्रशासनाचे दुर्देव.



               नगरपरिषदेतील सेवानिवृत्त कर्मचारी यांची फेब्रुवारी व मार्चची पेन्शन मिळावी म्हणून (11 एप्रिल) पासून नगरपरिषदे पुढे उपोषण सुरू झाले.नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या सोबतच्या बोलणीत मार्ग निघू शकला नाही.त्यामुळे उपोषण सुरुच राहणार आहे.
          फेब्रुवारी, मार्च 2022 ची पेन्शन 19 एप्रिलपुर्वी देण्यात यावी म्हणून सेवानिवृत्त कर्मचा-यांनी 16 मार्च 2012  रोजी  निवेदन दिले होते. जानेवारी 2022 ची पेन्शन 3 एप्रील रोजी खात्यात जमा झाली आहे. मागील दोन वर्षापासून पेन्शन नियमीत मिळत नाही. अनेक वेळा मुख्याधिकारी यांना  निवेदन देऊनही पेन्शन वेळेवर केली जात नाही .डिसेबर महीन्याची पेन्शन 24 फेब्रुवारी रोजी तर जानेवारी 2022 पेन्शन 3 एप्रिल रोजी दिली. पेन्शन दोन महिन्याच्या फरकाने दिली जाते. मागील दोन वर्षापासून अनेक सेवानिवृत्त कर्मचारि आजाराने ग्रस्त आहेत.अनेकांचे सेवानिवृत्ती चे उपदान मिळाले नाही तर अनेकांना प्रोव्हिडंटही मिळालेला नाही. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे येणे बाकी मिळावी. सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळावी अशी कर्मचार्‍यांची मागणी आहे. या मागण्यांसाठी या कर्मचार्‍यांनी नगर परिषद समोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर रास्त मार्ग काढण्यासाठी मुख्याधिकारी यांच्या सोबतच्या बोलणीत चर्चा झाली मात्र बोलणी फिसकटली.बोलणीसाठी प्रा बी जी खाडे, किरण सावजी, शंकर साळवे, जगन्नाथ शहाणे, भोसले आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. परंतु काहीच मार्ग निघू शकला नाही त्यामुळे हे उपोषण सुरुच राहणार असल्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.या उपोषणाला सेवानिवृत्त महिला कर्मचारी यांच्यासह 50पेक्षा अधिक सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले आहेत.
न.प.कर्मचारी यांचीही पगारी नाही  
सध्या सेवेत असलेल्या परळी नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांची दि. 11 एप्रिल रोजी पगार देण्याचे शिष्टमंडळांसोबत दि. 29 मार्च रोजी  झालेल्या चर्चेत ठरले होते. परंतु 11 तारखेला त्यांच्याही  2 महिन्याच्या  पगारी झाल्या नाहीत मुख्याधिकारी यांनी दिलेले हे आश्वासनही हवेतच विरळले. दोन दिवसावरच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून न.प.कर्मचार्‍यांच्या पगारी होणे. गरजेचे असताना त्या न झाल्याने न.प.च्या या कारभारावर कर्मचारी वर्गाचीही तीव्र नाराजी दिसून येत आहे. 

No comments:

Post a Comment