परळी वैजनाथ ( प्रतिनीधी ) परळी व परिसरातील थोर संत श्री जगमीञनागा महाराजांची ख्याती फारमोठी आहे, श्रीसंंत जगमीञनागा महाराज हे श्रीसंत मालीकेतील अतीशय थोरसंत म्हणुन ओळखले जातात. आक्षरशा त्यांनी व्याघ्ररुपी परमेश्वराला आपल्या भक्तीच्या जोरावर बांधन्याचा चमत्कार करुन दाखवला आहे. अशा थोरसंताची पालखी गुडीपाडव्याच्या दिवशी श्रीसंत जगमीञ नागा महाराज मंदिरातुन पंढरपुरला प्रस्तान करते व दरमुक्काम करत रामनवमीच्या दिवशी पंढरपुर येथे पोहोंचते व दशमीला परतीच्या प्रवासाला सुरवात करुन चैञ कृ नवमीला परळीला पोहोंचते. या पालखी मार्गात अत्यंत अडचणी व गैरसोई असुन त्या त्वरीत मंदिर समीतीने जातीने लक्ष घालुन तातडीने दुर करण्याची मागणी सामाजीक कार्यकर्ते राजकुमार डाके यांच्यासह सर्व वारकरी सांप्रदायाच्या वतीने करण्यात येत आहे.
श्रीसंत जगमीञनागा महाराजांनी या परिसराला भक्तीचा मार्ग दाखवला ज्यांच्या भक्तीमार्गामुळे परळी परिसरात भक्तांचा मळा फुलला अशा संताच्या पालखीचा सध्या फारमोठा अवमान होत आहे. श्रीसंत जगमीञनागा महाराजांनी सुरु केलेला पालखी सोहळयाची परंपरा आजहि परळी पंचक्रोशीतील भक्तगण मोठया कष्टाने अविरतपणे आजहि चालवतात. श्रीसंत जगमीञनागा महाराजांची पालखी चैञ महिण्यात असल्याने या काळात पालखीतील वारकर्यांना प्रखर उन्हाचा ञास सहन करत आडमार्गाने रानावनातुन कच्या रस्त्याने काटयाकुपाटयातुन वाट काढत काळया ढेकळातुन पालखी घेउन दरमुक्काम रोज चाळीस कीलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो. श्रीसंत जगमीञनागा महाराजांनी सुरुकेलेली वारी परळी परिसरातील असंख्य वारकरी बांधव आजहि नेटाने हि वारी चालवत आहे पण अलीकडील काळात श्रीसंत जगमीञनागा महाराज संस्थान ट्रस्ट जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत त्या वारकर्यांची हेळसांड करत असल्याचे चिञ पहावयास मीळते आहे. ज्या संस्थानच्या नावे परळी शहरातील प्रसिद्ध देवस्थान श्री वैद्यनाथाच्या सानिध्यात भव्य मंदिर, प्रशस्त सभामंडप व सर्वसोई सुविधांनीयुक्त मंगलकार्यालय, भक्तनिवास व भव्य मैदान असे वैभव असणार्या श्रीसंत जगमीञनागा महाराजांच्या पालखी सोहळयासाठी माञ मंदिर समीतीकडुन माञ कमालीची उदासीनता पहाण्यास मीळते. कुठल्याहि मंदिर संस्थानचे व पुजार्याचे आद्य कर्तव्य हे त्या दैवताचे तीर्थक्षेञाचे कार्य व्यवस्थीत पार पाडण्यासाठी त्याचे व्यवस्थीत नीयोजन करण्यासाठी व या देवस्थानच्या व भक्तांच्या सुविधेसाठी ट्रस्टची निर्मीती असते परंतु श्रीसंत जगमीञनागा महाराज संस्थान व पुजारी या कर्तव्यापासुन कमालीचे अनभिग्न असल्याचे पहावयास मीळते. जेव्हा हि पालखी पंढरपुरला रवाना होते व वारी करुन परत परळीत प्रवेश करते त्यावेळी सर्व मंदिर समीतीच्या वतीने परळीच्या हद्दीत या पालखीचे भव्य स्वागत करुण आदरपूर्वक श्रीसंत जगमीञनागा महाराजांना व वारीला गेलेल्या वारकर्यांना मंदिरात आणने क्रमप्राप्त असते. परंतु हल्ली या विरुद्ध चीञ सध्या पहावयास मीळते जेव्हा पालखी परत येते तेंव्हा श्रीसंत जगमीञनागा महाराजांच्या विश्वस्थापैकी एकहि विश्वस्थ यावेळी उपस्थित नसतो ना पुजारी उपस्थित नसतो, पालखी मार्ग साफ नसतो मंदिर परिसरात मुर्तीकाराने मुर्ती घडवतांना दगडाच्या झर चीपलंगी तुडवत अंधारातुन पालखी घेउन जावे लागते. वारी करुण आलेल्या वारकर्यांना मंदिरात आल्यावर साधी चहा पान्याची सुध्दा मंदिर समीती कडुन व्यवस्था करण्यात येत नाहि. तरी श्रीसंत जगमीञ नागा महाराज संस्थानने वेळीच याची दखल घेउन श्रीसंत जगमीञनागा महाराजांचा पारंपारीक पालखी सोहळयाबाबत वेळीच जागरुक होउन सुविधा पुरवाव्यात व पालखी मार्ग त्वरीत दुरुस्त करुण वारीतील वारकर्याची सन्मानपूर्वक सुविधा सुधारावी अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते राजकुमार डाके यांच्यासह परिसरातील सर्व वारकर्याकडुन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment