*रंभापुरी मठ संस्थानचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची उपस्थिती लाभणार.
* कार्यक्रम नियोजनसाठी बैठक.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) प्रभू वैद्यनाथाच्या श्रीक्षेत्र नगरीत कर्नाटक येथील गुरुवर्य ष ब्र श्री गुरु शांतेश्वर महास्वामीजी हिरेमठ संस्थान , (नेगळूरू, जिल्हा हावेरी) यांचे जून-जुलै महिन्यात महिनाभर अनुष्ठान होणार आहे या अनुष्ठान समाप्ती समारंभास रंभापुरी मठ संस्थानचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची उपस्थिती लाभणार आहे, हे जगद्गुरु परळीत प्रथमच येणार आहेत, त्यांच्या स्वागत संदर्भात येथील श्री गुरुलिंग स्वामी मठ संस्थान बेलवाडी येथे वीरशैव लिंगायत समाज बांधवांची बैठक 30 एप्रिल 2022 रोजी झाली.
रंभापुरी मठ संस्थानचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचे कर्नाटक येथील गुरुवर्य ष ब्र श्री गुरु शांतेश्वर महास्वामीजी हिरेमठ संस्थान , (नेगळूरू, जिल्हा हावेरी) यांच्या आषाढमास अनुष्ठान समाप्ती साठी परळी नगरीमध्ये आगमन होणार आहे .त्यासंदर्भातील नियोजनासाठी व महास्वामीजीना आमंत्रण देण्यासाठी सर्वानुमते ठराव घेण्यात आला. पुढील कार्यक्रमाची रूपरेषा लवकरच स्पष्ट करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. बैठकीस समाजातील सर्व सन्माननीय सदस्यांची उपस्थिती होती बैठकीस समाजाचे नेते डॉ.सुरेशचंद्र चौधरी, दत्ताप्पा इटके गुरुजी , विजयकुमार मेनकुदळे, नारायण देव गोपनपाळे,अॅड. शशिकांत नरवणे, शशांक निर्मळे ,प्रा अरुण अर्धापुरे , नरेश हालगे चंद्रकांत आप्पा समशेट्टे, नागेश हालगे, अश्विन मोगरकर ,श्री संजय खाकरे , ओमप्रकाश बुरांडे, गिरीश संकाये, चंद्रकांत उदगीरकर ,संदीप चौधरी मनोज संकाये , कपिल चौधरी,अॅड. नरहरी आप्पा टेकाळे ,अॅड. उ मरदंड, श्री ओम प्रकाश फडकरी, कैलास एसके, श्री अशोक झाडे ,सचिन स्वामी , योगेश स्वामी ,घेवारे आप्पा, गिरीश संकाये व उपस्थित होते.
No comments:
Post a Comment