Monday, March 21, 2022

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕक चौसाळा शाखेत भ्रष्टाचाराचा कळस मृत शेतकऱ्यांच्या नावाने उचलले जाते अनूदान ?


बीड (प्रतिनिधी)  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौसाळा शाखेत सूरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या सूरस कहाण्या बाहेर पडू लागल्या आहेत.दलाला मार्फत मृत शेतकऱ्याच्या नावे आलेले अनूदान देखील सहज उचलले जात असल्याचे अनेक प्रकार घडत आहेत.या प्रकारात दलाल शाखा व्यवस्थापकास टक्केवारी देऊन हे काम करत असल्याच सांगितलं जाऊ लागलं आहे.
डिसीसी बॅंकेत बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचा परिणाम मध्यंतरी मोडकळीस आली होती. या दोन-तीन वर्षात बँकेचे व्यवहार सुरळीत सुरू झालेले असताना पून्हा बॅंकेला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पोखरण्याच काम केलं जाऊ लागलं आहे. बँकेकडे शेतकऱ्यांचे अनुदान आले की गावोगांवच्या दलाला मार्फत अनूदानाची रक्कम संबंधित शेतकऱ्याला गावात जाऊन पैसे दिले जातात. या सेवेच्या मोबदल्यात प्रत्येक खाते दारामागे दोनशे तीनशे रुपये आकारले जातात. ही दलाल व्यक्ती त्या गावची प्रतिष्ठीत असल्यामुळे व बॅकेत रांगेत उभा रहाण्याचा त्रास वाढल्याने शेतकरीही पैसे सहज काढून देत विड्राॅलवर सही देखील देतात.इतकच नाही तर. मृत शेतकऱ्याचे अनुदान देखील असेच उचलले जाते. मात्र अशा रकमेला जास्त कमिशन दलालांना द्यावे लागते. कर्मचाऱ्यांना देखील टक्केवारी मिळत असल्यामुळे या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष केल्या जाते शिवाय वरिष्ठांना आम्हाला पैसा द्यावा लागतो असं सांगत भ्रष्टाचाराच समर्थन देखील केल्या जात.या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे.

No comments:

Post a Comment