*संत तुकाराम महाराजांच्या बीजोत्सवाच्या सोहळ्यास ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात दिंड्यासह लाखो भक्त पावनधामवर दाखल.
*माजी राज्यमंत्री अशोकराव पाटील, भाजपाचे नंदकिशोरजी मुंदडा, अंबा साखरचे चेअरमन रमेशराव आडसकर, माजी आमदार पृथ्वीराज साठे यांची प्रमुख उपस्थिती .
केज:(प्रतिनिधी) तालुक्यातील प्रतिदेहू श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथील संत तुकाराम महाराजांच्या बीजोत्सवाच्या सोहळ्यास संत तुकोबाराय पावनधामचे संस्थापक अध्यक्ष तथा अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनास माजी राज्यमंत्री अशोकराव पाटील, भाजपाचे नंदकिशोरजी मुंदडा, अंबा साखरचे चेअरमन रमेशराव आडसकर, माजी आमदार पृथ्वीराज साठे, जिल्हा परिषद सदस्य शंकर उबाळे, केज नगर परिषदेचे उपनगराध्यक्षपती पशुपतीनाथ दांगट, कौडगावचे सरपंचपती विष्णू चाटे, नगरसेवक मनोज लखेरा, नामदेव गोरे,सक्रिय पत्रकार संघाचे केज तालुकाध्यक्ष संतोष सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पावनधाम येथे मान्यवरांच्या आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांनी आपल्या कीर्तन सेवेत उपस्थित लाखोच्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांना आपल्या परखड आणि रसाळ वाणीने मंत्रमुग्ध केले. यावेळी बोलताना महंत महादेव महाराज म्हणाले कि,जगाच्या उध्दारासाठी तुकोबाराय आले आणि समाजामध्ये शांती निर्माण करण्यासाठी सर्व प्रकारच्या भेदाच्या भिंती ढासळून एक्याचा सिद्धांत प्रस्तापित केला.
सर्वांना एकत्रीत करून परमार्थाला लावले.
आणि जगामध्ये अलौकिक अशी क्रांती करून सदेह वैकुंठाला गेले. पुढे बोलताना ते म्हणाले की ,आपण छत्रपती शिवाजी महाराज,स्वामी विवेकानंदाच्या देशातील माणसे आहोत याचे भान ठेवून प्रत्येक तरूणांने व्यसनाच्या आहारी न जाता आदर्श जीवन
काल्याच्या किर्तनाच्या यशस्वीतेसाठी अमोल महाराज,जनार्धन महाराज,गणेश महाराज भगत,अशोक महाराज,कल्याण शिनगारे,रामराव नांदूरे,फुलचंद काकडे,दिलीप शिंदे,भागवत शिंदे,मधुकर भाकरे,अरूण काळे,इंजि.करपे,केशव धनगरे,प्रशांत देशमुख,ज्ञानेश्वर भिसे,सौदागर कदम,शंकर उबाळे,पत्रकार संतोष रोकडे यांच्या सह हजारो राज्यभरातून आलेल्या स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment