Sunday, March 20, 2022

थोडी लाज ठेवा.. आरोग्य विभागाने आशा सेविकांना दिलं रबराचं लिंग, चित्रा वाघ यांचा संताप.



बुलढाणा : राज्य सरकारकडून आशा सेविकांना कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग देण्यात आल्याचे प्रकरण समोर आला आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

आरोग्य विभागाने आशा सेविकांना दिलेल्या कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग देण्यात आले आहे. यामुळे आशा सेविकांसमोर  मोठा पेच निर्माण झाला आहे.

आरोग्य विभागाच्या या कारभारामुळे त्यावर महिला वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर आशा वर्कर नाराज असून आरोग्य विभागाने मात्र हे किट जनजागृतीसाठी दिले असल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहे.

मात्र हा प्रकार समोर आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे  आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना टॅग करत ट्विट  केले आहे. त्यात त्यांनी सडकून टीका केली आहे.

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..?? उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा… आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले 35/- रू. रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं.. वर हे अजून…थोडी लाज ठेवा…मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका…असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.

तसेच समाजसेविका डॉ. तबस्सुम हुसैन यांनी देखील या प्रकरणावरून आशा सेविकांचे समर्थन केले आहे. आशा वर्करांना ही किट घेऊन गावागावात जाऊन जनजागृती करणे अवघड झालं आहे.

कारण ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी असते. महिलांच्या घरी गेल्यावर लहान लहान मुले असतात. पुरूष मंडळी असतात. त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी बोलणे अवघड असतं, असे हुसैन यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment