Monday, March 28, 2022

दहावी बारावीच्या निकालाला लागु शकतो वेळ. विना अनुदानीत शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार.



पुणे : दहावी आणि बारावीचा निकाल यावर्षी रखडण्याची दाट शक्यता आहे, कारण विनाअनुदानित असलेल्या आशा शाळांमधील शिक्षकांनी पेपर तपासण्यास नकार दिला आहे. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत राज्यातील 30 हजार शिक्षकांनी पेपर तपासण्याच्या कामावर बहिष्कार टाकलेला आहे.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या आताच झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे 1200 हून अधिक गठ्ठे तपासणीविना पडून आहेत. जर सरकारने त्यांच्या मागण्या विचारात घेतल्या नाहीत तर त्यांच्या या आंदोलनाचा परिणाम दहावी, बारावीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे आणि यामुळे भविष्यात शिक्षण मंडळ संकटात सापडण्याची चिन्ह आहेत. शिक्षकांचे हे आंदोलन शासनाला थांबवता आले नाही तर निकालाच्या कामामध्ये मोठा विस्कळीतपणा येऊ शकतो

No comments:

Post a Comment