बीड (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जगदविवेक प्रतिष्ठानच्यावतीने जेथलिया हॉस्पिटल येथे सोमवार दिनांक 7 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान खास महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने विकास स्वामी आणि वैभव स्वामी यांनी केले आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बीड शहरातील जालना रोड येथे अक्षर प्लाझा, द्वारकादास मंत्री बँकेच्या मागे, शिवकमल हॉस्पिटल शेजारी,स्त्री रोग व प्रस्तुतीशास्त्र तज्ञ डॉक्टर सौ अनुपम जेथलिया ( राठी ) या महिलांच्या विविध समस्यांसह रजो निवृत्ती समस्या व उपचार तसेच वंध्यत्व निदान व निवारण या संदर्भात तपासणी व उपचार करणार आहेत. यासंदर्भात ज्या ही महिलांना समस्या आहेत त्यांनी 7 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जेथलिया हॉस्पिटल येथे सुरू असलेल्या महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जगदविवेक प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष विकास स्वामी आणि सचिव वैभव स्वामी यांनी केले आहे.
पत्रकारांच्या कुटुंबीयांनी शिबिराचा लाभ घ्यावा
जेथलिया हॉस्पिटल येथे सुरू असलेल्या महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सोमवार दिनांक 7 मार्च रोजी प्रत्यक्ष सहभागी होऊन आरोग्य संदर्भातील समस्यांवर प्रामुख्याने रजोनिवृत्ती समस्या आणि वंधत्व निदान व निवारण यासंदर्भात अडचणी असणाऱ्या पत्रकारांच्या कुटुंबियातील महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment