Wednesday, March 30, 2022

आगामी निवडणुकीत मनसे जास्तीत जास्त जागा लढविणार - सुमंत धस


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) आगामी निवडणुका लक्षात घेता व शिवतीर्थ मुंबई येथील पाडवा मेळावा उत्साहात पार पाडण्यासाठी राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परळी शहर व तालुक्यातील पदाधिकारी, शाखा अध्यक्ष व कार्यकर्त्यांची तसेच इतर अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी यांची तात्काळ बैठक मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे ,प्रवक्ते प्रकाश काका महाजन,राज्यउपाध्यक्ष अशोक भाऊ तावरे, यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत "शिवतीर्थ" मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय अरूणोदय मार्केट परळी वैजनाथ येथे दि. २९-०३-२०२२ मंगळवार रोजी दुपारी ४ वा पार पाडण्यात आली
विषय आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या मध्ये नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी निवडणूकी संदर्भात मनसे ची भुमिका स्पष्ट करताना सुमंत धस मनसे जिल्हा अध्यक्ष बीड यांनी सांगितले की मनसे आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढविणार आहे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयार रहावे व पक्ष वाढीसाठी कार्य करीत राहावे, तसेच येत्या २ एप्रिल शनिवार रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क "शिवतीर्थ" येथे होत असलेल्या पाडवा मेळाव्याच्या अनुषंगाने साधक बाधक चर्चा व विविध रिक्त पदाधिकारी नेमणुका करण्यात आल्या ज्या मध्ये तालुका उपाध्यक्ष पदी विठ्ठल झिलमेवाड तर शहर सचिव पदी डॉ.अशोक मंत्री यांची नियुक्ती करण्यात आली, बैठकीस परळी शहरातील व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शाखा अध्यक्ष,पक्ष सदस्यांची उपस्थित प्रामुख्याने दिसून येत होती.
या कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांच्या हस्ते, वैजनाथ कळसकर यांच्या नेतृत्वाखाली काशीनाथ कापसे, आणील म्हस्के, अभिषेक नागरगोजे,नरेश नागरगोजे, प्रशांत नागरगोजे,पार्थ नागरगोजे, गणेश नागरगोजे, दिनेश फड. यांचा पक्ष प्रवेश घेतला. 
त्यानंतर वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या सर्व सदस्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना स्वच्छता करते वेळी आवश्यक मास्क, ग्लोज, देऊन राज साहेब ठाकरे यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता दहीवाळ, केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार, परळी तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल झिलमेवाड,शहर सचिव डॉ अशोक मंत्री, मनविसे शहर अध्यक्ष हनुमान सातपुते,शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे, गणेश चव्हाण, सुमित कलशेट्टे, महेश शिवगण, ऋषिकेश बारगजे, सुनील भोसले, शाखा अध्यक्ष धनराज आवाड, माणीक लटींगे,सुहास विर, महेश घेवारे, शिध्दार्त लांडगे, डॉ.रामलींग घनचेकर, संजय राठोड, कोंडीबा मामा कुकर, अनंतराव गित्ते, धनंजय गाडवे, सोमनाथ राजनाळे, किशोर कुरे, श्रीमंत फड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment