Wednesday, March 9, 2022

बालसुधारगृहातील ५ अल्पवयीन मुलींवर बलात्कार ; आरोपी फिरोज शेख उर्फ ' बुड्ढा अंकल ' वर गुन्हा दाखल.


डोंगरी येथील बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलींवर एका ५० वर्षीय व्यक्तीने गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्याप्रकरणी १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे

साम टीव्हीच्या वृत्तानुसार ही घटना मुंबईतील चेंबूर येथे घडली असून डोंगरी येथील आशा सदन येथे समुपदेशन सुरू असताना पीडितेने तीच्या तीन लहान बहिणी (११ वर्ष, १३ वर्ष व १५ वर्ष वयाच्या) व एका मैत्रीणीवर आरोपी फिरोज शेख ऊर्फ बुढा अंकल याने बलात्कार केल्याची माहिती दिली होती. पीडितेच्या म्हणण्यानुसार आरोपीने पाच मुलींना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर लैंगिक आत्याचार केला. त्यानंतर या घटनेचं चित्रिकरण करुन आरोपीने त्याच्या मित्राला पाठवले आणि त्यांच्याकडून पैसे घेतले

या पैशातील काही रक्कम आरोपीने पीडित मुलींनाही दिली होती. या घटनेनंतर त्या मुलींना या आरोपीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं. हा आत्याचार चेंबूर परिसरात २०१८ ते २०२१ दरम्यान झाल्याचं पीडितेने सांगितलं. दरम्यान चेंबूर येथील कुंठनखान्यातून पीडित १७ वर्षीय मुलीची २०१९ मध्ये सुटका करण्यात आली होती. परंतु आरोपीचे आत्याचार चालूच होते.


दरम्यान डोंगरी येथील आशा सदन येथे समुपदेशन सुरू असताना समुपदेशन करणाऱ्या महिलांना १७ वर्षीय पीडित मुलीने ही घटना सांगितली. त्यानुसार चेंबूर येथील आर.सी.एफ. पोलिसांनी सदर ५० वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन याप्रकरणी शेख विरोधात ३७६(२) (आय), ३७६ (२) (अ), ३७६ (२) (ब), ३७६(२)(ई), भादंवि सह ४,६,८,१२ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या सह ३,४,५ अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यासह, ६६(ई) व ६७ माहीती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment