Wednesday, March 30, 2022

मराठी नववर्ष गुढीपाडव्यापासून श्री वैद्यनाथ प्रभूंचे स्पर्श दर्शन सुरू करा-अभयकुमार ठक्कर


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पुर्णपणे थांबला असून 2 एप्रिलपासून राज्यातील सर्व प्रकारचे कोरोना निर्बंध मागे घेतले जाणार आहेत. तथापि 2 वर्षापासून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी येथील वैद्यनाथ मंदिरातील श्रीं चे स्पर्श दर्शन बंद असून मराठी नववर्ष प्रारंभ म्हणजेच गुढीपाडव्यापासून हे स्पर्श दर्शन सुरू करावे अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख  तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार ठक्कर यांनी केली आहे.
महाराष्ट्रात कोरोना साथ रोग आता पूर्णपणे थांबला असून नाथांचे वैद्य असलेल्या परळी येथील श्री वैद्यनाथ प्रभूंचे पारंपारिक स्पर्श दर्शन पुर्ववत सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख  तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार ठक्कर यांनी केली आहे. राज्यातील सर्वच मंदिरे सुरू झाली असून काही ठिकाणी गर्भगृहात दर्शन सुरू करण्यात आले आहेत. परळी येथील श्री वैद्यनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिगापैकी एक असून येथेही पूर्वीप्रमाणेच स्पर्श दर्शन सुरू करावे असे ठक्कर यांनी म्हटले आहे. श्रीं च्या स्पर्श दर्शनाचे मोठे महत्व असून प्रशासनाने याची दखल  घेत स्पर्श दर्शन सुरू करावे अशी मागणी अभयकुमार ठक्कर यांनी केली आहे. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असून त्यादिवशी दर्शन सुरू करणे योग्य होईल असे सांगून जिल्हा प्रशासनाने वैद्यनाथ देवस्थानला स्पर्श दर्शन सुरू करण्याची परवानगी द्यावी असेही ते म्हणाले आहेत.

No comments:

Post a Comment