परळी वैजनाथ (प्रतिनिधी)पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेच्या वतीने आज मंगळवार दिनांक एक मार्च रोजी महाशिवरात्र उत्सवाच्या निमित्ताने भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेच्या वतीने आज मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. परळी तालुक्यातील श्रीक्षेत्र जिरेवाडी येथील जागृत देवस्थान श्री सोमेश्वर महाराज यांची पालखी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथ महाराजांच्या भेटीसाठी महाशिवरात्रीला मंदिरात जात असते. प्रारंभी श्री सोमेश्वर महाराजांच्या पालखीचे श्री प्रल्हाद सावंत व संचालक मंडळाने मनोभावे दर्शन घेतले तसेच पालखीमध्ये सहभागी भाविक भक्तांना पवनराजे अर्बन निधी मल्टीपर्पज बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत आणि सचिव गोविंद भरबडे यांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळांच्या उपस्थितीत प्रसादाचे वितरण करण्यात आले.
यावेळी पवनराजे बँकेचे सेक्रेटरी गोविंदराव भरबडे उपाध्यक्ष बाबासाहेब हंगरगे पाटील संचालक सर्वश्री,गोविंद मुंडे,प्रल्हाद काळे,सचिन भरबडे,म.आरेफोद्दीन म.जमालोद्दीन तांबोळी,गोविंद उदावंत,बालासाहेब घवले,वैजयंतीमाला घवले,मयूर जिरगे,रामेश्वर भोसले,सोनाली वैराळे,ज्ञानेश्वर सातपुते, बालासाहेब पोरे,विनायक राठोड,संस्थेचे जेष्ठ सभासद योगशिक्षक बालासाहेब कराड सर ,परमेश्वर काळे,डॉ. राउत सर,कार्यालयीन कर्मचारी सोमनाथ चाटे,सत्यप्रकाश कराड,शुभम पालकुडतेवर, राजाराम दराडे,पवन सावंत,मयुरी शिंदे,पल्लवी स्वामी,निलेश पुजारी,सौरव बांगड,दत्ताभाऊ दिक्षित, गोपाळ बोबडे,आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment