बीड (प्रतिनिधी) बीड तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदी गणेश दादा बजगुडे पाटील यांची निवड झाल्यानंतर काल भारतीय मराठा महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दादा पवळ यांच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील म्हणाले की, काँग्रेस पक्ष दुरदृष्टी, वैचारिक व राष्ट्रीय पक्ष असुन स्वतंत्र पुर्व काळापासून काँग्रेसने विकासाचे राजकारण केलेले आहे. बीड जिल्ह्याचे भुषण लोकनेता खासदार रजनीताई पाटील या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या मेंबर असुन जम्मु काश्मीर पासुन कन्याकुमारी पर्यंत काँग्रेसची विचारधारा पोहचवण्याचे काम करत आहेत. त्यांच्याच नेतृत्वात व माजी मंत्री अशोक दादा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात युवा नेते आदित्य दादा पाटील, जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल सोनवणे, नवनाथ थोटे व जिल्हयातील सर्व टीम काँग्रेस पक्ष वाढीसाठी काम करत आहेत. यासर्वांच्या नेतृत्वात बीड तालुका काँग्रेसमय करुन तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी काँग्रेस पक्षात सहभागी व्हावे असे आवाहन गणेश बजगुडे यानी केले. यावेळही तालुक्यातील सहाकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment