*दूरध्वनी क्रमांक फक्त नाम फलकावर लिहण्यासाठीच उपयोगाचा. जनसामान्यामध्ये चर्चेला उधाण.
संबंधित दूरध्वनी क्रमांक हा जनसामान्याच्या सेवेसाठी म्हणजेच परिसरात काही आपत्कालीन घटना घडली ,एखादा विपरीत प्रकार घडला, रस्त्यात कुठे अपघात झाला , कुठं भांडण तंटा झाला ,एखादी व्यक्ती संकटात सापडलेली असली अश्या परिस्थितीत एक मदत म्हणून प्रथम प्राधान्याने पोलीस स्टेशन कडे बघितल्या जात आणि त्यांना संपर्क केला जातो.आणि गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीने किंवा कुठे अपघात झाला त्याची हकीकत विचारण्यासाठी पत्रकार यांना पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा लागतो अशी असणारी एकंदरीत परिस्थिती आहे अश्या परिस्थितीत संपर्क क्रमांकच बंद असले तर माहिती घ्यायची कोणाकडून किंवा संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत मिळेल कशी अश्या वेळेस एखाद्या गावाच्या सेवेसाठी नेमणूक करण्यात आली अश्या कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचे कडून उडवा उडवीची उत्तरे ऐकायला मिळतात पत्रकारितेचा उद्देश हाच असतो की घडलेला प्रकार व अपघात झालेल्या व्यक्तीची माहिती त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहचविणे जेणे करून त्याला मदत होईल संबंधित विभाग जर का माहिती देण्यास टाळाटाळ करत असेल तर सदर गुन्हेगारास प्रोत्साहन तर देत नाहीत ना ? अपघाताची माहिती लपविण्यामागचे रहस्य काय ? अवैध धंदे यांच्या कारवाई होतात त्या फक्त गुन्हे नोंदविण्या पुरतेच ती कारवाई प्रसिद्ध होऊ नये का ? दोन तीन पूर्वी एकाच रोडवर ट्रॅकरच्या धडकेने अपघात झाले त्यात एकाला आपले प्राण गमवावे लागले आणि बाकी गंभीर जखमी झाले यात रेती घाट घेणाऱ्या मालकाचे आणि संबंधित विभागाचे साटेलोटे तर नाही ना ? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून चर्चेला उत आला आहे.
No comments:
Post a Comment